'दिलबर गर्ल' Nora Fatehi ने निवडला आपला जोडीदार

नोराच्या डान्सची जोरदार चर्चा 

Updated: Nov 5, 2020, 08:32 PM IST
'दिलबर गर्ल' Nora Fatehi ने निवडला आपला जोडीदार

मुंबई : नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या डान्समुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. नोराचे डान्स स्टेप चाहते कॉपी करत असतात. नोरा सोशल मीडियावर देखील खूप ऍक्टिव असते. त्याचप्रमाणे नोरा आपल्या हॉट फोटोशूटमुळे पण चर्चेत आहे. नोराच्या चाहता वर्ग खूप मोठा आहे. 

नोरा लवकरच करणार लग्न 

नोरा फतेहीने आपल्या लग्नासाठी जोडीदार शोधला आहे. तसेच ती लग्नासाठी पूर्णपणे तयार असल्याचं तिने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे. नोरा लवकरच लग्न करणार आहे. नोराला लग्नाकरता एक प्रपोझल आलं आहे. त्या मुलाला बघून नोरा स्वतःला रोखू शकली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Nora Fatehi (@norafatehi) on

नोराने एका लहान मुलाचा फोटो शेअऱ केला आहे. या मुलाची माहिती देताना नोरा म्हणते की मला याच्याशी लग्न करायचंय.