बॉयफ्रेन्डमुळे नाही तर आयरा आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत..

आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डेचं औचित्य साधत आयराने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. 

Updated: Jul 19, 2021, 08:59 AM IST
बॉयफ्रेन्डमुळे नाही तर आयरा आज वेगळ्या कारणामुळे चर्चेत..

मुंबई : अभनेता आमिर खानची मुलगी आयरा खान  कायम तिच्या बॉयफ्रेन्डमुळे चर्चेत असते. पण आज ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण स्वतःवर, आरोग्यावर फार कमी लक्ष देतो. आता आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डेचं औचित्य साधत आयराने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये आयराने तिच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे, जो फार धक्का देणारा आहे. सध्या आयराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान   व्हायरल होत आहे.

आयरा व्हिडिओम्ध्ये म्हणाली, 'अशी कोणत्या गोष्टी आहेत, ज्यांना आपण सेल्फ केअरमध्ये मोजू शकतो. ज्या मी मला वाईट वाटलं तेव्हा करते. मी कायम  विचार करते स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी मी काय करू शकते आणि आता माझ्या लक्षात आलं की मी आतापर्यंत जे काही केलं त्यामुळे माझ्या वाट्याला नुसकान आलं आहे.  '

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ira Khan (@khan.ira)

'अशा एकही गोष्टीचा विचार केला नाही ज्यामुळे माझं आरोग्य ठिक राहीलं. अशात दोन गोष्टी म्हणजे  फनी आणि बिलकूल फनी नाही.'  आंतरराष्ट्रीय सेल्फ केअर डे म्हणजे 24 जुलै रोजी सर्वांचं आरोग्य लक्षात घेत आयराने Agatsu फाऊंडेशनच्या अनेक एक्टिव्हिटीज प्लान केल्या आहेत. त्याला आयराने Pinky Promise to Me असं नाव दिलं आहे. 

आयरा कायम तिच्या बॉयफ्रेन्ड नूपुर शिखारेमुळे चर्चेत असेते. नूपुर शिखारे आमिर खानचा फिटनेस कोच आहे. पिंकव्हिलाने दिलेल्या रिपोर्टनुसार लॉकडाऊनच्या काळात जेव्हा इराने स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला. तेव्हा इरा आणि नूपुर यांच्यातील नातं फुललं. त्यानंतर त्यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र पसरू लागली.