दिशा पटानी नव्हेतर श्रीवल्लीसोबत जुळताहेत टायगर श्रॉफसोबत सूत?

 ‘पुष्पा’ गर्ल रश्मिका मंदान्ना आणि अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ हे दोघंही सध्या जोरदार चर्चेत आहेत.

Updated: Jul 12, 2022, 07:15 PM IST
दिशा पटानी नव्हेतर श्रीवल्लीसोबत जुळताहेत टायगर श्रॉफसोबत सूत? title=

मुंबईः पुष्पा’ गर्ल रश्मिका मंदान्ना आणि अॅक्शन हिरो टायगर श्रॉफ हे दोघंही सध्या जोरदार चर्चेत आहेत. रश्मिका आणि टायगर लवकरच एकत्र स्क्रिन शेअर करणार आहेत. यामुळे त्यांचे चाहते त्यांच्यावर भलतेच खुश आहेत. ही बातमी जरी वाऱ्यासारखी पसरत असली तरी एकत्र स्क्रिन शेअर करण्यापलीकडेही त्यांच्यात वेगळेच काहीतरी शिजू लागलं आहे की काय अशी कुजबुजही त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू झालीये.

रश्मिका मंदान्ना आणि टायगर श्रॉफ सध्यातरी कोणत्याही चित्रपटात दिसणार नसले तरी ते त्यांच्या एका स्पेशल शूटमुळे मात्र भलतेच चर्चेत आहेत. नुकताच या दोघांचा धमाकेदार व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. एक व्हिडिओही रश्मिकाने तिच्या इन्टाग्राम अकांऊटवरून शेअर केला आहे.

इन्टाग्राम पेजवर टायगर श्रॉफबद्दल बोलताना रश्मिकाने मोठा खुलासा केला आहे. रश्मिकाने हाच व्हिडिओ स्वतःच्या इन्टाग्राम स्टोरीवरही पोस्ट केला आहे. यावरून ती टायगर श्रॉफसोबत एका जाहिराताच्या शूटसाठी एकत्र येत आहे हे स्पष्ट झाले आहे. ज्याबद्दल तिने स्वतःच खुलासा केला आहे. यामध्ये रश्मिका टायगरसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. तिने त्या व्हिडिओमध्ये को-ओर्ड सूट घातला आहे तर टायगर श्रॉफने लाल टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट घातली आहे.

हा व्हिडिओ शेअर करत रश्मिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, मित्रांनो अफवा खऱ्या होत्या. टायगरसोबत एका अॅड शूटमध्ये मी एकत्र काम करत आहे. त्याच्याबरोबर एकमेकांसोबत काम करणे खरोखरच छान होतं. दोघांचे फॅन क्लब आणि प्रेक्षक हा व्हिडिओ खूप शेअर करत आहेत असं तिने लिहिले आहे तसेच लवकरच दोघेही चित्रपटात काम करणार असल्याचेही तिने म्हटलं आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रश्मिका मंदान्ना लवकरच 'पुष्पाः द रूल' या चित्रपटातून दिसणार आहे. याशिवाय ती लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’, ‘गुडबाय’, ‘अॅनिमल’ आणि विजय थलापथीसोबत ‘वारीसू’ असे रश्मिकाचे अनेक प्रोजेक्ट लाईन-अप आहेत. जॅकी श्रॉफचा मुलगा टायगरच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर तो 'बडे मियाँ छोटे मियाँ', 'रॅम्बो' आणि क्रीती सॅननसोबत 'गणपथ'मध्ये दिसणार आहे.