Nysa Devgn Got Trolled Over Her Attitude : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि काजोल (Kajol) यांची लाडकी लेक न्यासा देवगन ही लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. न्यासा ही नेहमीच लाइमलाइटमध्ये असते. न्यासा ही 19 वर्षांची आहे. न्यासा गेल्या अनेक वर्षांपासून परदेशात पदवीचं शिक्षण घेण्यासाठी गेली होती. बऱ्याचवेळा न्यासा ही अनेक सेलिब्रिटी किंवा स्टार किड्ससोबत दिसते. नुकताच न्यासाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पापाराझींना पाहताच न्यासानं ज्या प्रकारे रिअॅक्ट केलं ते पाहून काही लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत न्यासा देवगण, इब्राहिम अली खान, ऑरी आणि माहिका रामपाल दिसत आहे. न्यासा त्यांच्यासोबत ख्रिसमस पार्टी सेलिब्रेट करण्यासाठी मुंबईतील एक रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. यावेळी न्यासानं गुलारी रंगाचा बॉडी कॉन ड्रेस परिधान केला होता. पार्टी करून न्यासा बाहेर आल्यानंतरचा हा व्हिडीओ आहे. न्यासा ओव्हर अॅक्टिंग करत असल्याचे काही नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.
यावेळी तिचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यासाठी पुढे येतात. त्यावेळी कॅमेरा समोर येताच न्यासानं ज्या प्रकारे रिअॅक्ट केलं ते पाहून तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांचे म्हणणे आहे की न्यासा आधी पेक्षा आता खूप वेगळी दिसते. तिचा रंग आधी सावळा होता पण काही वर्षात न्यासा खूप बदलली आहे. आता न्यासाचा रंग उजळला आहे. अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे की तिनं सर्जरी केली आहे.
एका मुलाखतीत काजोलने ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलं आहे. न्यासा इंटरनेटवर खूप सक्रिय आहे आणि तिला सौंदर्य आणि आरोग्याबद्दल बरीचशी माहिती आहे. ती आठवड्यातून तीन वेळा फेस मास्क वापरते आणि मलाही ती फेस मास्क वापरण्याचा सल्ला देते. तसंच न्यासा आपल्या वडिलांसारखी फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सीरियस आहे. अनेकवेळा मी न्यासाकडून ब्यूटी टीप्स (Beauty Tips) घेत असल्याचं काजोलने म्हटलं आहे. न्यासाचे आधीचे आणि आताचे फोटो पाहिले तर मोठा फरक जाणून येईल. न्यासा आता 19 वर्षांची आहे आणि तिचे चाहते तिच्या बॉलिवूड पदार्पणाची आतुरतेने वाट पहात आहेत.
हेही वाचा : "यापुढे तुझा फोन मला कधीच येणार नाही आणि...", आईच्या निधनानंतर अभिनेत्री Resham Tipnis भावूक
न्यासाचा जन्म हा 20 एप्रिला 2003 रोजी झाला होता. न्यासानं सिंगापूरमध्ये पदवीचं शिक्षण घेतलं. 2019 मध्ये आजोबा वीरू देवगण यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी न्यासा जेव्हा सलूनमध्ये पोहोचली तेव्हा लोकांनी तिला चांगलंच ट्रोल केलं होतं.