दिवसभर दारू प्यायची आणि Sex... व्यसनच ते; अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा

एका लोकप्रिय अभिनेत्यानं मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. 

Updated: Mar 28, 2022, 03:54 PM IST
दिवसभर दारू प्यायची आणि Sex... व्यसनच ते; अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : कोणा एका व्यक्तीवर प्रेम करणं त्याहूनही ते प्रेम निभावणं सर्वात महत्त्वाचं असतं. पण, अनेकदा प्रेमाच्या या नात्यात त्याचाच अभाव दिसून येतो. कित्येकांसाठी प्रेमाचं हे नातं म्हणजे फक्त आणि फक्त शरीरसुख इतकंच. हे वाचून धक्का बसतोय? 

एका लोकप्रिय अभिनेत्यानं मुलाखतीदरम्यान याचा खुलासा केला होता. त्याचं वक्तव्य ऐकून सर्वांना धक्काच बसला. (Will Smith)

हा अभिनेता होता विल स्मिथ. सध्या विलचं नाव चर्चेत आलं ते म्हणजे क्रिस रॉकला भर ऑस्करमध्ये इंगा दाखवल्यामुळे. पत्नीविषयी खिल्ली उडवणारं वक्तव्य करणाऱ्या क्रिसला विलनं दणका दिला. यावरुनच त्याचं पत्नीशी असणारं नातं समोर आलं. 

पण, विल आणि जेडा पिंकेट स्मिथ यांच्या नात्याची एक अशी बाजूही आहे, जी सर्वांसमोर आली आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

दरम्यान, विल आणि जेडाच्या या नात्यात दुरावाही आला होता. त्यावेळी जेडा ऑगस्ट अल्सिना या गायकाच्या प्रेमात होती. पण त्यानंतर आपल्याला या नात्यातून संकोलचेपणा आणि खजिल भावच जास्त मिळाले असा उलगडा तिनं एका मुलाखतीत केला होता. 

90 च्या दशकात आपली ओळख झाली तेव्हा हे नातं पूर्णपणे शारीरिकच होतं, असं विल मुलाखतीत म्हणाला होता. सुरुवातीच्या चार महिन्यांत आम्ही एकतर दारू प्यायचो किंवा अनेकदा सेक्स करायचो. 

मला वाटायचं की एकतर मी हिला आनंद देईन किंवा मग प्रयत्न करण्यातच माझा अंत होईल', असं विल म्हणाला होता. 

मी इतक्या महिलांसोबत शरीरसंबंध ठेवले आहेत की, यासाठी मी Psychosomatic पणे व्यक्तही व्हायचो. यामुळं मला अनेकदा उलटीही होत होती, असं तो म्हणाला.