२ मुलांची आई अन् इतके फॉलोअर्स? पाहा कोण आहे 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री

पाकिस्तान आणि तिथल्या स्टार्सचे शो भारतात देखील खूप प्रसिद्ध आहेत. 

Updated: Jul 26, 2022, 07:38 PM IST
२ मुलांची आई अन् इतके फॉलोअर्स?  पाहा कोण आहे 'ही' पाकिस्तानी अभिनेत्री title=

मुंबई : पाकिस्तान आणि तिथल्या स्टार्सचे शो भारतात देखील खूप प्रसिद्ध आहेत. कला क्षेत्रातला कोणतंही बंधन नसतं हे यातून पाहायला मिळतं. इथले लोक तिथल्या मालिका मोठ्या उत्साहाने पाहतात. तिथल्या कलाकारांचे लाखो भारतात लाखो चाहते आहेत. सध्या पाकिस्तानी अभिनेत्री आयजा खान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, ती चर्चेत असण्याचं कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे...चला तर जाणून घेऊया त्या मागचं कारण...

आयजाचे भारतात लाखो चाहते आहेत. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. आयजा सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे पाकिस्तानमध्ये इन्स्टाग्रामवर सगळ्यात जास्त फॉलोवर्स असणाऱ्या सेलिब्रिटीजमध्ये ती प्रथम स्थानी आहे. यासोबतच आयजाने पाकिस्तानातील प्रसिद्ध व्यक्तींनाही मागे टाकले आहे. तिला इन्स्टाग्राम अकाऊंटवर 12 मिलियन लोक फॉलो करत आहेत. त्याच वेळी, माहिरा खानला 9.4 मिलियन, सबा कमर 5.4 मिलियन आणि फवाद खानला फक्त 1.4 मिलियन लोक फॉलो करतात.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आयजा खान जवळपास 18 वर्षांपासून अभिनय क्षेत्रात आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. खासगी आयुष्याविषयी जाणून घ्यायचं असेल तर आयजाने दानिश तैमूरशी निकाहं केला. दानिश हा एक अभिनेता आहे. आयजा आणि दानिशची दोन मुलं आहेत. 

आयजाचं नावं वादात अडकलं होतं. आयजाच्या भावाजी होणारी पत्नी अरुबा तारिकने त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या कारणामुळे अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. आयजाने जवळपास ३० मालिकांमध्ये काम केले. तिला अनेक अवॉर्ड मिळाले आहेत. आयजाला सर्वोत्त्म अभिनेत्रीचा अवॉर्डही मिळाला होता. 

आयजा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. बऱ्याचवेळा मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. आयजाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या चित्रपटातील गाण्यावर रील बनवताना दिसत होती. लोकांना तिचे भारतावरील प्रेम प्रचंड आवडले.