'पंचायत 3' मध्ये आमदाराची भूमिका निभावणारा अभिनेता पंकज झाला चाहत्यांकडून पसंती मिळत आहे. पंकज झा यांनी साकारलेली आमदाराची भूमिका 'पंचायत' च्या पहिल्या सिझनपासून चर्चेत होतं. या आमदारासोबत झालेली कॉमेडी ही ट्रॅजेडीमधून घडली आहे. या वेबसीरिजमध्ये मुख्य कलाकार म्हणून रघुबीर यादव, नीना गुप्ता, जितेंद्र कुमार आणि फैजल मलिकसोबत पंकज झा यांच्या कामाची देखील चर्चा झाली. पंकज यांनी 2012 मधील 'गँग ऑफ वासेपुर'चे दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्यावर निशाना साधला आहे.
पंकज झा 'पंचायत 3' मधील त्याच्या भूमिकेसाठी खूप चर्चेत आहे. त्याची दबंग शैली चाहत्यांना खूप आवडली आहे. मात्र, पंकज झा हे मनोरंजन विश्वासाठी नवीन नाव नाही. गुलाल, ब्लॅक फ्रायडेसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आणि नाव कमावले. 'गँग्स ऑफ वासेपूर' हा पंकज झा यांच्या यशस्वी प्रोजेक्टपैकी एक असू शकतो. अनुराग कश्यपच्या या चित्रपटात त्याला तीच भूमिका ऑफर करण्यात आली होती. ज्यामुळे पंकज त्रिपाठी स्टार बनले होते. पंकज झा यांना 'गँग्स ऑफ वासेपूर'मध्ये 'सुलतान कुरेशी'ची भूमिका ऑफर करण्यात आली होती, जी नंतर पंकज त्रिपाठीने साकारली होती. आता पंकज झा या भूमिकेबद्दल बोलले आहेत.
पंकज झा यांनी डिजिटल कॉमेंटरीशी संवाद साधताना ते 'गँग्स ऑफ वासेपूर'चे सुलतान बनता बनता राहिला. पंकज झा यांना विचारण्यात आले की, त्यांना प्रथम गँग्स ऑफ वासेपूरमध्ये सुलतानची भूमिका ऑफर करण्यात आली होती, परंतु नंतर ती दुसऱ्याला मिळाली. हा सुद्धा राजकारणाचा भाग आहे का? उत्तर देताना पंकज झा म्हणाले- 'माझ्यावर राजकारणाचा प्रभाव पडत नाही. तसे झाले असते तर राजकारणी जिंकले असते. मला या सगळ्याची पर्वा नाही. कोणाच्या पाठीमागे राजकारण करणारे भ्याड असतात. ज्यांचामध्ये धमक असते ते समोर येऊन बोलतात.
इतकेच नाही तर मुलाखतीदरम्यान पंकज झा यांनी स्वत:ला डायरेक्टर मेकिंग ॲक्टर ही पदवीही दिली. अनुराग कश्यपवर हसत तो म्हणाला - 'गुलालसारखे चित्रपट कलाकार बनवतात, ते दिग्दर्शकही बनवतात. पण, इथले लोक इतके भ्याड आणि पाठीचा कणा विरहीत आहेत की जे आपल्या एका शब्दावर ठाम राहत नाहीत. नंतर मला कळले की दिग्दर्शकाची स्वतःची अवस्था वाईट होती. कोणतेही काम मिळत नव्हते आणि एका प्रोजेक्टवर 36 वेगवेगळे लोकं काम करत होते.
पकंज झा सांगतात- 'मी एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी पाटण्याला गेलो होतो. तिथे मला त्याचा (अनुराग कश्यप) मेसेज आला की, भेटायला यायला सांगितले. मी त्यांना सांगितले की मी शूटिंगच्या मधोमध आहे आणि एक-दोन दिवसांत परत येऊ शकेन. तेव्हा मला कळले की, या भूमिकेसाठी आणखी कोणाला तरी कास्ट करण्यात आले आहे. बरं मला अजूनही अनुराग खूप आवडतो. माझी त्याच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नाही.