'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात इरफानसोबत झळकणार पंकज

पंकज त्रिपाठी यांनी 'लुका छुपी' या विनोदी बोल्ड आणि 'मिर्जापुर' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. 

Updated: Apr 14, 2019, 03:10 PM IST
'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात इरफानसोबत झळकणार पंकज title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता इरफान खान लवकच 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाच्या माध्यमातून चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता इरफान खानवर यूकेमध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर बऱ्याच काळानंतर इरफान आता चित्रपटातून कमबॅकसाठी तयार आहे. तर या चित्रपटात अभिनेता पंकज त्रिपाठी इमरानसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

पंकज त्रिपाठी यांनी 'लुका छुपी' या विनोदी बोल्ड आणि 'मिर्जापुर' मध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. आता पंकज 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून भूमिका साकारणार आहे. २०१७ साली आलेल्या 'हिंदी मीडियम' चित्रपटाचा सिक्वल असणार आहे. 

पंकजला भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आल्या नंतर तो म्हणाला, 'चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून माझी भूमिका आहे. माझी आणि इरफानचा मैत्री फार घट्ट आहे. मला इरफानसोबत काम करण्याची इच्छा नेहमीच होती. जेव्हा मला दीनूने हा रोल ऑफर केला तेव्हा मी क्षणाचाही विलंब न करता भूमिकेसाठी होकार दिला.'     
 
'अंग्रेजी मीडियम' या आगामी चित्रपटात इरफान खानची मुलगी म्हणून पटना फेम राधिका मदान काम करणार आहे. 'अंग्रेजी मीडियम'मध्ये करीना एका पोलीसाच्या भूमिकेत दिसणार असल्याची माहिती मिळत आहे. 'अंग्रेजी मीडियम' चित्रपटाचे होमी अदजानिया दिग्दर्शन करत असून दिनेश विजन चित्रपटाचे निर्माते आहेत.