प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात...'अजूनही तो कोमात', काकांनी दिली हेल्थ अपडेट

साऊथचा सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की त्याचा पुतण्या साई धरम तेज अजूनही कोमात आहे. 

Updated: Sep 27, 2021, 06:37 PM IST
प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा अपघात...'अजूनही तो कोमात', काकांनी दिली हेल्थ अपडेट

मुंबई : साऊथचा सुपरस्टार अभिनेता पवन कल्याणने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान सांगितलं की त्याचा पुतण्या साई धरम तेज अजूनही कोमात आहे. काहिदिवसांपूर्वी अभिनेता साई धरमचा हैदराबादमधील माधापूर केबल ब्रिजवर 10 सप्टेंबर रोजी अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाला होता.

आठवडाभरापूर्वी हॉस्पिटलने एक निवेदन जारी केलं होतं की, साई धरम तेजला व्हेंटिलेटरवरून काढून टाकण्यात आलं आहे आणि तो सकारात्मक प्रतिसाद देत आहे. मात्र, त्यानंतर रुग्णालयातून कोणतीही अधिकृत अपडेट आलेलं नाही. पण अभिनेत्याचे काका 'पॉवरस्टार' पवन कल्याणने जाहीरपणे सांगितलं की, तेजला रुग्णालयात दाखल केल्यापासून त्याने डोळे उघडलेले नाहीत आणि तो अजूनही कोमात आहे. जेव्हा-जेव्हा मी रुग्णालयात गेलो तेव्हा-तेव्हा मी त्याला डोळे उघडलेलं पाहिलेलं नाही. तो बेशुद्ध आहे.

अलीकडेच, तेजचा चुलत भाऊ अभिनेता राम चरण म्हणाला की, अपघाताच्या दिवशी तो पूर्णपणे ठीक होता. तो आपल्या स्पोर्ट्स बाईकवर सिटीमध्ये फिरायला गेला होता. दुसरीकडे, सुपरस्टार चिरंजीवीने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात सांगितलं होतं की, स्टार साई धरम तेजची प्रकृती वेगाने सुधारत आहे. पण आता पवन कल्याण यांच्या वक्तव्यानंतर तेजच्या चाहत्यांमध्ये निराशेची लाट आहे.

रोड अपघातात, साई धरम तेला कॉलर बोन फ्रॅक्चर आणि सॉफ्ट टिश्यूंना इजा झाली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, गाडीच्या वेगामुळे त्याने दुचाकीवरील नियंत्रण गमावलं. नंतर पोलिसांनी असंही सांगितलं की, बाईक रस्त्यावर चिखलामुळे घसरली होती.