अरुणितासमोर Pawandeep Rajan कडून भावी पत्नी विषयी मोठी कबूली

 इंडियन आयडल विजेता पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. 

Updated: Oct 28, 2021, 04:53 PM IST
 अरुणितासमोर Pawandeep Rajan कडून भावी पत्नी विषयी मोठी कबूली  title=

मुंबई : इंडियन आयडल विजेता पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी नेहमीच चर्चेत पाहायला मिळते. नुकतीच ही जोडी कपिल शर्मा शो मध्ये पोहोचली होती. 

काही दिवसांपूर्वी या जोडीचं नवं अल्बम साँग प्रदर्शित झालं आहे. त्यात या दोघांचा रोमॅन्टिक डान्स पाहायला मिळतो आहे. सर्वांची फिरकी घेणाऱ्या कपिल शर्माने पवनदीपसोबत देखील मजामस्ती केली आणि त्याला काही प्रश्न विचारले. 

कपिलने पवनदीपला विचारले, तुला इंडियन आयडलचं विजेतेपद पटकावल्यावर पैसा मिळाला, गाडी मिळाली, मग गाडीच्या लेफ्ट सीटवर बसणारी कोणी मिळाली की नाही ? यावर पवनदीप म्हणाला, एक मोठं घर आणि काही पैसे कमवण्यासाठी माझी मेहनत सुरु आहे. ज्यामुळे त्याची भावी पत्नी चांगलं आयुष्य आणि सुख सुविधा असलेलं आयुष्य जगू शकेल. 

कपिल शर्माने ऑडिशनच्या वेळी अरुणिताने गायलेल्या 'ओ री पवन' या गाण्यावरुन देखील तिच्यासोबत थट्टा करण्याचा प्रयत्न केला.