PHOTOS : रेड कार्पेटवर विराट-अनुष्का

शनिवारी मुंबईत 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विराट कोहली फाऊंडेशननं आयोजित केला होता.

Updated: Nov 12, 2017, 04:18 PM IST
PHOTOS : रेड कार्पेटवर विराट-अनुष्का  title=

मुंबई : शनिवारी मुंबईत 'इंडियन स्पोर्ट्स ऑनर'चं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम विराट कोहली फाऊंडेशननं आयोजित केला होता. क्रीडा जगतातल्या खेळाडूंबरोबरच बॉलीवूड सेलिब्रिटीही या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हातात हात घालून चालताना पाहायला मिळाले. 

Virat kohali and Anushka sharma

फोटो सौजन्य : बॉलीवूड लाईफ.कॉम

विराट आणि अनुष्का ग्लॅमरस लूकमध्ये रेड कार्पेटवर आल्यावर सगळ्यांच्याच नजरा त्यांच्याकडे खिळल्या. याआधी विराट आणि अनुष्का 'मान्यवर'च्या एका जाहिरातीत एकत्र दिसले होते. या जाहिरातीमध्ये विराट आणि अनुष्का एकमेकांना वचन देताना पाहायला मिळाले. 

Virat kohali and Anushka sharma

फोटो सौजन्य : बॉलीवूड लाईफ.कॉम

याआधी अनेकवेळा विराट-अनुष्कानं त्यांच्या रिलेशनशीपबाबत बोलणं टाळलं होतं. पण आता दोघांचा दृष्टीकोन बदलल्याचं दिसत आहे. अनुष्का अजूनही तिचं वैयक्तिक आयुष्य आणि विराटसोबतच्या नात्याबद्दल बोलताना दिसत नाही. पण विराट मात्र अनुष्कासोबतच्या नात्याबाबत आता खुलून बोलत आहे. 

Virat kohali and Anushka sharma

फोटो सौजन्य : बॉलीवूड लाईफ.कॉम

झी टीव्हीवर आमिर खानसोबतच्या कार्यक्रमामध्ये विराट कोहली अनुष्का शर्माबद्दल खुलून बोलला. आमिरच्या या शोमध्ये विराटनं अनुष्काबाबतच्या गोष्टीही सांगितल्या. मी अनुष्काला नुष्की म्हणतो, असं विराटनं या शोमध्ये सांगितलं होतं. 

Virat kohali and Anushka sharma

फोटो सौजन्य : बॉलीवूड लाईफ.कॉम

अनुष्का शर्मा ही इमानदार आहे आणि तिची हीच गोष्ट मला आवडते, असं विराट कोहली म्हणाला होता. माझं ५-१० मिनीटं उशीरा येणं अनुष्काला आवडत नसल्याचं या शोमध्ये विराटनं सांगितलं. 

फोटो सौजन्य : बॉलीवूड लाईफ.कॉम

Virat kohali and Anushka sharma