मुंबई : झी युवा मालिकेवरील लोकप्रिया मालिका ठरली फुलपाखरू. या मालिकेतील वैदही आणि मानसची जोडी प्रेक्षकांनी उचलून धरली. या जोडीबाबत प्रेक्षकांना खास कुतूहल आहे.
होणार सून मी या घरची या सुपरडुपर हिट मालिकेनंतर मंदार देवस्थळी गुलमोहर आणि फुलपाखरू या दोन मालिका घेऊन आले आहेत.प्रेक्षकांना खिळवून ठेवत वेगवेगळे प्रयोग करणं हेच मंदार देवस्थळींचं खास वैशिष्ट्य...फुलपाखरूमध्ये मानस आणि वैदेहीवर रोमॅण्टिक गाणं चित्रित केल्यानंतर आता दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांनी याच जोडीवर एक रॅम सॉंग चित्रीत केलंय. मानस-वैदेहीचा फुल टु रॉकिंग अंदाज या गाण्यात बघायला मिळतोयं.
मानस - वैदहीच्या प्रेमाला घरच्यांकडून आता परवानगी मिळाल्यानंतर या दोघांचं प्रेम अधिक फुलू लागलं आहे. तरूणाईत या जोडीची जोरदार चर्चा आहे. हे गाणं सगळ्यांच्याच पसंतीला पडत आहे.