close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अबब… प्रियंकाचा बर्थडे केक किती रुपयांचा?

प्रियंका चोप्रा हिचा वाढदिवस नुकताच झाला. मात्र, तिच्यासाठी ज्याने केक आणला त्या केकचीच चर्चा आहे. 

Updated: Jul 31, 2019, 07:15 PM IST
 अबब… प्रियंकाचा बर्थडे केक किती रुपयांचा?
(छाया सौजन्र्य : @priyankacentral/Instagram)

वॉशिंग्टन : अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा वाढदिवस नुकताच झाला. मात्र, तिच्यासाठी ज्याने केक आणला त्या केकचीच चर्चा सध्या होत आहे. या केकची किंमत तुम्ही ऐकली तर तुम्हाला धक्काच बसेल. या केकची किंमत हजारात नव्हती तर लाखो रुपयांत आहे. प्रियंकाचा पती निक जोनास याने खास केकची मागवला होता. लग्नानंतरचा प्रियंकाचा पहिलाच वाढदिवस होता. त्यामुळे जोनासही हा वाढदिवस साजरा करण्यासाठी तयारी करत होता. प्रियंकाने आपला ३७ वा वाढदिवस पती निक, आई मधुमालती चोप्रा, बहीण परिणिती चोप्रा यांच्यासोबत साजरा केला. 

प्रियंकाने आपल्या वाढदिवसानिमित्ताने  खास पोषाख परिधान केला होता. गडद लाल रंगाच्या पोषाखात प्रियांका खुलून दिसत होती. तिच्या वाढदिवसानिमित्त आणलेला केकही तिच्या पोषाखाला मिळता-जुळता असा लाल आणि सोनेरी रंगाचा खास निकने बनवून घेतला होता.  तसेच हा केक अनेक मजल्यांचा होता. हा केक पाच थरांचा उंच असा आकर्षक होता. त्यामुळे या केकची चर्चा तर होणारच.  हा केक तब्बल ५ हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे ३ लाख ४५ हजार रुपयांचा होता, अशी माहिती आता पुढे येत आहे. प्रियंकाच्या प्रेमापोटी निकने हा खास केक मागविला होता. 

PICS: प्रियंका के बर्थडे पर निक ने रखी सरप्राइज पार्टी, अब सामने आईं खूबसूरत तस्वीरें

@priyankacentral/Instagram

निकने मागवलेला हा केक बनवण्यासाठी २४ तास लागले. निकला प्रियंकाच्या पोषाखासारखाच केक हवा होता. विशेष म्हणजे प्रियंकाची आवड लक्षात घेऊन निकने हा केक मागविला होता. प्रियंकाला सोनेरी रंगातील नक्षीकाम आवडते हे निकला माहीत होते. त्यामुळे त्याने तशी ऑर्डर दिली होती. हा केक चॅकलेट आणि व्हेनिलापासून बनविण्यात आला होता. मियामीतील एका प्रसिद्ध बेकरीत हा पाच थरांचा केक बनवण्यात आला.