Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट

Pooja Bhatt : पूजा भट्ट ही सध्या छोट्या पडद्यावर असलेल्या एका रिअॅलिटी शोमुळे चर्चेत आहे. पूजा भट्टविषयी अनेक गोष्टी सोशल मीडियावर सर्च करण्यात येत आहे. तर त्यात पूजा भट्ट तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट यांच्यात एक साम्य असून त्यांनी शिक्षण पूर्ण केलेलं नाही. 

दिक्षा पाटील | Updated: Jul 22, 2023, 05:45 PM IST
Bigg Boss OTT मध्ये पूजा भट्टचा मोठा खुलासा, इतक्या वर्षांनी सांगितलं 'ते' सिक्रेट
(Photo Credit : Social Media)

Pooja Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही सोशल मीडियावर सध्याा चर्चेचा विषय ठरत आहे. पूजा चर्चेत असण्याचं कारण 'बिग बॉस ओटीटी 2' आहे. या कार्यक्रमात ती एक स्पर्धत म्हणून गेली आहे. यावेळी पूजा कोण आहे, ती काय करते ते तिच्या नवऱ्यापासून सगळ्याच गोष्टी या चर्चेत आहे. सगळ्यांना तिच्या खासगी आयुष्यातील सगळ्याच गोष्टींविषयी जाणून घ्यायचे आहे. त्यातही पूजासोबत तिचे वडील महेश भट्ट आणि सावत्र बहीण आलिया भट्ट देखील चर्चेत आले आहेत. पूजाच्या शिक्षणाविषयी माहिती शोधत असताना नेटकऱ्यांसमोर महेश भट्ट आणि आलिया भट्ट यांच्यापण काही गोष्टी समोर आल्या असून भट्ट कुटूंबातील साम्य समोर आलं आहे. 

पूजा भट्ट ही तिची सावत्र बहीण आलिया प्रमाणे 12 वी पर्यंत शिकली आहे. पूजा आणि आलिया या दोघांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं नाही त्या दोघींनी बारावीपर्यंतचं शिक्षण करतं. अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पूजानं या कार्यक्रमात खुलासा केला की तिचे वडील म्हणजेच महेश भट्ट यांनी तिला कॉलेजमध्ये अॅडमिशन घेऊ दिलं नाही. त्यांनी पूजाला कॉलेजमधून ड्रॉप घेत शिक्षण सोडण्यास सांगितलं होतं. पूजाला शिक्षण सोडण्यास सांगत तिच्या घरच्यांनी तिला सांगितलं की डिग्री आणि शिक्षणाचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. एका डिग्रीनं कोणतीही व्यक्ती किती सक्षम आहे हे सांगता येत नाही. तर कोणतीही डिग्री ते किती सक्षम आहेत हे सिद्ध करू शकत नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

याविषयी सविस्तर सांगत पूजानं सांगितलं की तिचे वडील महेश भट्ट देखील एक ड्रॉपआउट आहेत. पण त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की डिग्री आणि शिक्षण हे एकमेकांना जोडलेलं नाही. पूजा पुढे म्हणाली की तिनं 12 वी पर्यंत शिक्षण केलं असलं तरी इंग्रजी तिला येते आणि त्याचं पूर्ण श्रेय हे पारसी शाळेला जातं. जिथे तिनं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : उर्फी जावेदसोबत फ्लाइटमध्ये गैरवर्तन, नशेत असलेल्या मुलांनी केलं धक्कादायक कृत्य

पूजाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिनं आजवर अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण ती स्वत: म्हणते की तिनं जास्त चित्रपट केले नाहीत. पण जे केले ते खूप चांगले केले. तर पूजा भट्टप्रमाणे तिची सावत्र बहीण आलिया भट्ट देखील तितकीच लोकप्रिय आहे. आलिया भट्टनं वयाच्या 19 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x