वडिलांना किस करण्याच्या वादावर पूजा भट्टचं स्पष्ट वक्तव्य; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाली 'एका निष्पाप...'

Pooja Bhatt : पूजा भट्टनं एका मुलाखतीत तिच्या आणि वडिलांमध्ये झालेल्या त्या किसच्या कॉन्ट्रोव्हर्सीवर वक्तव्य केलं आहे. इतकंच नाही तर यावेळी तिनं शाहरुख खानचा देखील उल्लेख केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 11, 2023, 03:14 PM IST
वडिलांना किस करण्याच्या वादावर पूजा भट्टचं स्पष्ट वक्तव्य; शाहरुखचा उल्लेख करत म्हणाली 'एका निष्पाप...' title=
(Photo Credit : Social Media)

Pooja Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडिया पोस्ट असतात तर कधी तिचं खासगी आयुष्य असतं. पण सगळ्यात जास्त चर्चा ही नेहमीच पूजा आणि तिचे वडील महेश भट्ट यांच्यातील किस. पूजा भट्ट आणि महेश भट्ट यांनी 1990 मध्ये एका मॅगझीनच्या कव्हर पेजसाठी फोटोशूट केलं होतं. त्यावरून त्या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. पण आता एका मुलाखतीत पूजानं सांगितलं की तिला कोणत्याच गोष्टीचा पश्चाताप नाही. पण ज्या प्रकारे ती गोष्ट दाखवण्यात आली त्याचं वाईट वाटलं. 

पूजा भट्ट म्हणाली की 'वाईट या गोष्टीचं वाटतं की माझ्या त्या फोटोला चुकीच्या पद्धतीनं दाखवण्यात आलं. हा एक निष्पाप क्षण होता. ज्याला जे करायचं आहे ते करतील. मी इथे बसून त्यावर काही बोलणार नाही. जर कोणी अशा प्रकारे वडील आणि मुलीच्या नात्यावर प्रश्न करणार असतील तर काय म्हणावं. पूजानं सांगितलं की शाहरुख खाननं देखील त्याला हेच सांगितल्याचं त्यानं म्हटलं. त्यानं हे देखील सांगितलं की आई-वडिलांसमोर तुम्ही नेहमीच मुलं रहाल. तुम्ही त्यांना किस करून तुमचं प्रेम दाखवू शकता. यात काही चुकीचं नाही.' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे पूजानं वडील महेश भट्ट यांनी सोनी राजदान यांच्याशी दुसरं लग्न करण्याच्या निर्णयावर म्हणाली की, 'मला त्या विषयी सांगण्यात आलं होतं. माझ्या आई-वडीलांनी मला बसवलं आणि त्यांच्या नात्यात असलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. त्यांच्यात काहीच चांगलं नाही हे सांगितलं. माझे आई-वडिल कधीच त्यांच्या मुलांशी खोटं बोलले नाही. हे एक फिल्मी कुटुंब आहे. हे नेहमीच पत्रकारांपासून त्यांचं खासगी आयुष्य लपवत असतात. कारण त्यांना काहीही फरक पडत नाही.' 

हेही वाचा : संसदेत अनेकदा दांडी मारणारा सनी देओल राजकारणाविषयी असं का म्हणाला? 'गदर 2' नंतर पुन्हा त्याचीच चर्चा

पुढे पूजा म्हणाली की 'जर लोक वडील आणि मुलीच्या नात्याकडे वेगळ्या नजरेनं पाहत असतील तर त्यात ते काहीही करू शकतात. त्यात मी काहीही करू शकत नाही. इतकंच नाही तर त्यात आपण फॅमिली व्हॅल्यू बद्दल बोलतो. हा सगळ्यात मोठा विनोद आहे. पूजा भट्ट ही काही दिवसांपूर्वी 'बिग बॉस ओटीटी 2' मध्ये दिसली होती. '