रात्री माझे व्हिडीओ पाहतात, सकाळी नको ते बोलतात; अब्रूवरून हिणवणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री

मी अंगप्रदर्शन करते, विवस्त्र होते.... 

Updated: Mar 4, 2022, 11:07 AM IST
रात्री माझे व्हिडीओ पाहतात, सकाळी नको ते बोलतात; अब्रूवरून हिणवणाऱ्यांवर संतापली अभिनेत्री  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळे अनेकदा नेटकऱ्यांना अशा गोष्टी अगदी सहज उपलब्ध होतात की विचारून सोय नाही. यातही अनेकदा लोकं आव असा आणता की आम्ही धुतल्या तांदळाजोगे स्वच्छ. बऱ्याच मॉडेल्स किंवा बोल्ड अभिनेत्रींना याचा अनुभव अनेकदा आला आहे. जिथं याच अभिनेत्रींचे मादक फोटो पाहणाऱ्यांनीच त्यांची खिल्ली उडवावी हे पाहून अखेर एकिचा संताप अनावर झाला. 

ही अभिनेत्री आहे, पूनम पांडे. एका कार्यक्रमादरम्यान, बोलताना पूनमनं तिच्या संघर्षावर भाष्य केलं. 

मी अंगप्रदर्शन करते, विवस्त्र होते, यासाठी तुम्ही मला शरम नसणारी वगैरे म्हणणार? तर मी तुमच्या मताशी सहमत नाही. कारण, जे दुसऱ्याच्या शरमेवर बोलतात त्यांनी स्वत:बद्दल विचार करावा. 

एखाद्या पोस्टवर 60 मिलियन इंप्रेशन, 200 मिलियनचा टप्पा तोही एका महिन्यात हे सर्व असंच तर नाही ना होत. हे कोण फॉलोअर्स आहेत?, असा सवाल तिनं केला. 

रात्री ही लोकं माझे व्हिडीओ पाहतात आणि सकाळी मला ट्रोल करतात, माझ्याविरोधात बोलतात, मला ठाऊक करुन घ्यायचंय की कोण आहेत ही माणसं?, असं विचारत तिनं समाजाच्या मानसिकतेवर निशाणा साधला. 

समाज दुसरंतिसरं काही नसून 5 बायकांनी एकत्र येऊन दुसऱ्या बायकांचे वाभाडे काढायचे, असं म्हणत तिनं आपल्याबाबतच टाकून बोलणाऱ्यांवर तोफ डागली. 

मी लग्न कोणाशी केलं, मी कसे कपडे वापरावेत, बाळाला कधी जन्म द्यावा हे मी ठरवेन कारण हे माझं आयुष्य आहे, असं म्हणत पूनमनं ती नेमकी कोणत्या प्रसंगांचा दैनंदिन जीवनात सामना करते यावर प्रकाश टाकला.