नागरिकांना नव्या वर्षाचे गिफ्ट; गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी, वाचा नवे दर

LPG Gas Cylinder New Rate: नवीन वर्षातच ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 1, 2025, 09:16 AM IST
नागरिकांना नव्या वर्षाचे गिफ्ट; गॅस सिलेंडरच्या किंमती झाल्या कमी, वाचा नवे दर  title=
LPG Cylinder New Rates Commercial gas cylinder price down by Rs 14-50 in the new year

LPG Gas Cylinder New Rate: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच देशभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 14.50 रुपयांची घट झाली आहे. 19 किलोंच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात झाली आहे. तर, 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताच बदल झालेला नाही. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घट झाल्यानंतर आज राजधानी दिल्लीत 1804 रुपयांना मिळणार आहे. याआधी1818.50 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत होता. 

१ जानेवारी २०२५ रोजी तेल आणि गॅस मार्केटिंग कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कपात केली असून दिल्ली ते मुंबई गॅस सिलिंडरचे दर १४ ते १६ रुपयांनी कमी झाले आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरसाठी ग्राहकांना आता १,८०४ रुपये मोजावे लागतील तर, मुंबईत व्यवसायिक सिलिंडरची किंमत १,७५६ रुपयांपर्यंत आहे, जी याआधी १,७७१ रुपये होती. याआधी गेल्या महिन्यात म्हणजे पहिल्या डिसेंबरला महागाईचा मोठा धक्का बसला आणि १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली. मात्र आता दरात कपात करण्यात आल्याने हॉटेल आणि रेस्तरॉमधील बिल कमी होणार आहे. 

गॅस सिलेंडरबरोबरच एअरलाइन्सवरदेखील नवीन वर्षात इंधनाच्या किंमतीत कपात करुन नागरिकांना मोठी भेट दिली आहे. OMCs ने जानेवारीपासून हवाई ईंधनाच्या किंमतीत कपात केली आहे. यामुळं विमानाच्या तिकिटांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विमान इंधनाच्या एटीएफ किमतींमध्ये प्रति लिटर 11401.37 रुपयांचा दिलासा मिळाला होता. नोव्हेंबर महिन्यात 1318.12 रुपये प्रति किलोग्रॅमच्या दरात वाढ झाली आहे.

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत 2025च्या पहिल्या दिवशीदेखील कोणतेही बदल झालेले नाहीत. राजधानी दिल्लीत 14 किलो म्हणजेच घरगुती सिलेंडरच्या जुन्या किंमतीत म्हणजेच 892.50 रुपयांनाच मिळणार आहे. तर, मुंबईत 802.50 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती 829 रुपये आणि चेन्नईत 818.50 रुपये आहेत.