काय... प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? VIRAL व्हिडीओमागचं सत्य समोर येताच खळबळ

Prabhas Bald Look Video : प्रभासचा बाल्ड लूक हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी प्रभासचा हा लूक पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यात आता मोठी बातमी समोर आली आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Aug 29, 2023, 12:14 PM IST
काय... प्रभासच्या डोक्यावर केसच नाहीत? VIRAL व्हिडीओमागचं सत्य समोर येताच खळबळ title=
(Photo Credit : Social Media)

Prabhas Bald Look Video : 'बाहुबली' फेम आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास हा त्याच्या डॅशिंग पर्सनॅलिटीसाठी ओळखला जातो. प्रभासचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. सध्या सोशल मीडियावर प्रभासचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत प्रभास एका महिलेसोबत पोज देत असल्याचे दिसत आहे. मात्र, या सगळ्यात सगळ्यांचे लक्ष या गोष्टीनं वेधलं आहे की प्रभासचे विरळ केस... प्रभासच्या डोक्यावर खूप कमी केस असल्याचे त्यात पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहता सोशल मीडियावर चांगलाच वाद पेटला आहे. चाहत्यांना या गोष्टीनं मोठा धक्का लागला असल्याचे पाहायला मिळत आहे. 

प्रभासचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आता चर्चा सुरु असताना त्याचे काही चाहते म्हणत आहेत की बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांनी ट्रान्सप्लांट केलं आहे. अशात प्रभासचा हा लूक कधीही न पाहिलेला आहे. हा व्हिडीओ जूना असू शकतो किंवा मग फेक असू शकतो असे अनेकांचे म्हणणे आहे. आता त्याची सत्यता तपासण्यात आली असता यात सत्य नाही हे समोर आलं आहे. तर कोणत्या एका व्यक्तीनं गंमत म्हणून हा व्हिडीओ असा एडिट केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

सध्या त्याच्या करिअरच्या त्या टप्प्यातून जात आहे जिथे कोणत्याही कलाकाराला जायची इच्छा नसते किंवा त्या गोष्टीचा सामना करणं कठीण होतं. प्रभासचे एका मागे एक चित्रपट फ्लॉप ठरत आहेत. सगळ्यात आधी त्याचा राधे श्याम हा पूजा हेगडेसोबतचा चित्रपट फ्लॉप ठरला तर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर फक्त 170 कोटींची कमाई केली होती. दुसरीकडे नुकताच त्याचा आदिपुरुष हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमी कमाई केली असून 225 कोटींचं नुकसान झालं आहे. 

हेही वाचा : चक्क इरफान खान यांच्या नावावरून ठेवलं मुलीचं नावं, मराठी अभिनेत्यानं केलेल्या कृतीनं चाहते भावूक

प्रभास आता त्याचा एक धमाकेदार चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रभासच्या या चित्रपटाचं नाव 'कल्कि 2898 AD' असं आहे. या चित्रपटाला आधी 'प्रॉजेक्ट के' असं नाव देण्यात आलं होतं. या चित्रपटाच बजेट हे 600 कोटींचं आहे. या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन आणि कमल हासन महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.