CBSE Board Exam Full Time Table: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. दहावी बोर्डाची परीक्षा 18 मार्चला संपणार आहेत. तर बारावीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत सुरु असेल. सीबीएसईने परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यासह शाळांना परीक्षेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी बोर्डाकडे सोपवण्यात सांगण्यात आलं आहे
सीबीएसईने आपली वेबसाईट cbse.gov.in वर दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा 2025 ची डेटशीट जारी केली आहे. वेळपत्रकानुसार, दोन्ही परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरु होतील. दहावीचा पहिला पेपर इंग्रजीचा असेल. तर 12 वीचा 15 फेब्रुवारीला एंटरप्रेन्योरशिपची परीक्षा असेल, तसंच 17 फेब्रुवारीला फिजिकल एज्युकेशनची परीक्षा असेल.
"2024 च्या परीक्षांचे निकाल जाहीर करताना, CBSE ने असंही घोषित केलं की 2025 मध्ये इयत्ता दहावी आणि बारावीच्या दोन्ही परीक्षा 15.02.2025 पासून सुरू होतील. त्यानुसार, शाळांना दहावी आणि बारावीच्या परीक्षार्थींची यादी सादर करण्याची विनंती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी ऑफर केलेल्या विद्यार्थ्यांच्या आधारे सीबीएसईने 15.02.2025 पासून होणाऱ्या परीक्षेचं डेटशीट तयार केलं आहे,” असं CBSE ने सांगितलं आहे.
सीबीएसईने म्हटलं आहे की, दोन्ही वर्गातील विद्यार्थ्याद्वारे सामान्यतः ऑफर केलेल्या दोन विषयांमध्ये पुरेसं अंतर ठेवण्यात आलं आहे. "प्रवेश परीक्षेची तारीख पाहता बारावीच्या विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला असून, प्रवेश परीक्षांपूर्वी परीक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे," असं त्यात म्हटलं आहे.
परीक्षा सुरू होण्याची वेळ सकाळी 10.30 असणार आहे. दरम्यान प्रथमच, परीक्षा सुरू होण्याच्या सुमारे 86 दिवस आधी डेट शीट जारी करण्यात आल्या आहेत.
CBSE शैक्षणिक वेबसाइट cbseacademic.nic.in वर विद्यार्थी 10वी आणि 12वी च्या नमुना प्रश्नपत्रिका पाहू शकतात. विद्यार्थ्यांना नवीनतम प्रश्न स्वरूप, मार्किंग आणि परीक्षा पद्धतींशी ओळख करून देण्यासाठी या नमुना प्रश्नपत्रिका डिझाइन केलेले आहेत, जेणेकरून ते त्यांच्या बोर्ड परीक्षांची प्रभावीपणे तयारी करू शकतील.