Maharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला. पण आलिया भट्ट आणि कतरिना कैफ यांनी मतदान का केलं नाही? वाचा सविस्तर 

सोनेश्वर पाटील | Updated: Nov 21, 2024, 03:44 PM IST
Maharashtra Assembly Election: आलिया भट्ट आणि कतरिना कैफ मतदान का करू शकल्या नाहीत? title=

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. अनेक कलाकारांनी आपल्या मतदारसंघात जावून मतदान केलं. त्यानंतर काही कलाकारांनी मतदान केल्यानंतर फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले. ज्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, कियारा आडवाणी, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव सह अनेक कलाकारांनी 20 नोव्हेंबर रोजी आपल्या आवडत्या प्रतिनिधीला मतदान केलं. 

मात्र, अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला, परंतु बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट, कतरिना कैफ, नोरा फतेही आणि जैकलीन फर्नांडीजसह अनेक कलाकारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. काय आहे यामागचे कारण? जाणून घेऊयात.

आलिया भट्ट, कतरिना कैफ यांनी का केलं नाही मतदान? 

आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही भारतीय नागरिक नाहीये. तिच्याकडे ब्रिटिश नागरिकत्व आहे. त्यामुळे आलिया भट्टला भारतात मतदान करता येत नाही. यापूर्वी आलिया भट्टने हार्ट ऑफ स्टोनच्या तिच्या पहिल्या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान आलियाने तिच्या ब्रिटीश नागरिकत्वाची पुष्टी करताना म्हटले होते की, माझ्या आईचा जन्म हा बर्मिंगहॅममध्ये झाला होता. पण मी भारतात जन्मले आणि वाढले असं तिने म्हटलं होतं. 

कतरिना कैफ

कतरिना कैफ हिच्याकडे देखील ब्रिटिश पासपोर्ट आहे. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे काश्मिरी वंशाचे ब्रिटिश व्यापारी आहेत. तर तिची आई सुजैन टरकोटे एक इंग्रजी वकील आहे. द एशियन एजला दिलेल्या मुलाखतीत कतरिनाने सांगितले होते की, मी भारतीय आहे आणि माझे वडील भारतीय आहेत. जरी माझी आई ब्रिटीश असली तरी, माझी आई मी 17 वर्षांची असताना भारतात आली होती आणि तेव्हापासून हे माझे घर आहे.

नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेहीकडे कॅनडाचे नागरिकत्व आहे. बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी नोरा कॅनडातून भारतात आली होती. बीबीसी एशियनमध्ये तिच्या इंडस्ट्रीतील प्रवासाची आठवण करून देताना नोरा फतेही म्हणाली होती की, 

मला मिळालेली प्रत्येक संधी अगदी शेवटच्या क्षणी आली आणि कृतज्ञतापूर्वक मी तयार होते. बंद खोलीत टीव्ही चालू करून ती टीव्हीवर गोष्टी पाहण्याची आठवण तिने सांगितली. ती हिंदीवर काम करत होती. ती इतर मुलींसारखी पार्टी करत नव्हती आणि तिचा बॉयफ्रेंड देखील नव्हता.