'मला भिंतीवर डोकं आपटून...'; आई होण्यापूर्वीच्या काळाबद्दल बोलताना प्रीती झिंटाचं विधान

अभिनेत्री प्रीती झिंटा ही 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांची आई बनली होती. मात्र, त्याआधी तिने IVF उपचार घेतले होते. तोच काळ आठवून अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिची व्यथा मांडली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Sep 5, 2024, 01:13 PM IST
'मला भिंतीवर डोकं आपटून...'; आई होण्यापूर्वीच्या काळाबद्दल बोलताना प्रीती झिंटाचं विधान title=

Preity Zinta : 49 वर्षीय बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने 2016 मध्ये अमेरिकन रहिवासी जीन गुडइनफसोबत लग्न केले.  त्यानंतर तिने 2021 मध्ये सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला. त्याआधी तिने IVF उपचार केला होता. ज्याबद्दल अभिनेत्रीने नुकताच एका मुलाखतीत तिच्या गर्भधारणेच्या टप्प्याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीने सांगितले की तिला कोणत्या त्रासांना सामोरे जावे लागले आणि तिला कोणत्या गोष्टी सहन कराव्या लागल्या. 

प्रीती झिंटाने 'वोग इंडिया'शी बोलताना सांगितले की, इतरांप्रमाणेच तिच्या आयुष्यात देखील अनेक वेगवेगळे कठीण दिवस आले. असे दिवस होते की तिला तिचे डोके भिंतीवर आपटायचे होते. 

IVFच्या दिवसांमध्ये प्रीती झिंटाला त्रास 

प्रीती झिंटा म्हणाली की, इतरांप्रमाणे माझ्या देखील आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस आले आहेत. काहीवेळा वास्तविक जीवनात नेहमी आनंदी आणि भाग्यवान राहण्याचा संघर्ष असतो. विशेषकरून जेव्हा तुम्ही कठीण काळातून जात असाल.  मला देखील IVF सायकल दरम्यान असे वाटायचे. 

'मला भिंतीवर डोक आपटून रडायचं होतं'

प्रीती झिंटा म्हणाली, सर्व वेळ हसत राहणे आणि छान राहणे खूप कठीण होते. कधीकधी मला भिंतीवर डोके आपटून रडायचे होते आणि कोणाशी बोलायचे देखील नव्हते. सर्व अभिनेत्यांसाठी ही एक संतुलित कृती आहे. 

अभिनेत्री पती आणि मुलांसोबत अमेरिकेत राहते 

अभिनेत्री प्रीती झिंटा ही पती जीन गुडइनफ आणि दोन्ही मुलांसोबत अमेरिकेत राहते. तिच्या मुलाचे नाव जय आणि मुलीचे नाव जिया आहे. काही महिन्यांपूर्वीच प्रीती झिंटा ही आपल्या मुलांना घेऊन भारतात आली होती. अमेरिकेत असताना प्रीती झिंटा आणि तिची मुले प्रियांकाची मुलगी मालतीसोबत हँग आउट करताना दिसली होती.

प्रीती झिंटाचा आगामी चित्रपट

2014 पासून अभिनेत्री प्रीती झिंटा ही अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. 2018 मध्ये ती 'भैयाजी सुपरहिट' या चित्रपटात दिसली होती. ज्याद्वारे तिने दीर्घ कालावधीनंतर पुनरागमन केले. त्यानंतर ती पुन्हा अभिनयापासून दूर गेली. आता अभिनेत्री 'लाहौर 1947' या चित्रपटात दिसणार आहे. मात्र, सध्या या चित्रपटाची घोषणा झालेली नाही.