लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रिया बापट-उमेश कामतनं शेअर केला लिपलॉक फोटो

Priya Bapat and Umesh Kamat Liplock Photo: आज प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या लग्नाचा आज 12 वा वाढदिवस आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या निमित्तानं त्यांनी आपला एक क्यूट फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांच्या लिपलॉक फोटोची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Oct 6, 2023, 02:12 PM IST
लग्नाच्या वाढदिवसानिमित्त प्रिया बापट-उमेश कामतनं शेअर केला लिपलॉक फोटो  title=
priya bapat shares liplock photo with umesh kamat on their wedding anniversary

Priya Bapat and Umesh Kamat Liplock Photo: मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय कलाकार उमेश कामत आणि प्रिया बापट यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्या दोघांचे एकत्र नाटक 'जर तरची गोष्ट' हे रंगभूमीवर चांगलेच गाजले आहे. त्यामुळे या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. या नाटकातून प्रिया आणि उमेशसह आशुतोष गोखले आणि पल्लवी अजय यांच्याही महत्त्वपुर्ण भुमिका आहेत. हे नाटकही रिलेशनशिपवर आधारित आहे. या चित्रपटाला गेल्या दोन महिन्यात सर्व वयोगटातील प्रेक्षकांनी गर्दी केली आहे. 'नवा गडी अन् नवं राज्य' या नाटकांनंतर प्रिया उमेश यांचे 'जर तरची गोष्ट' हे नाटकं प्रचंड गाजतं आहे.

त्यामुळे आता त्यांच्या या नव्या नाटकाची सगळीकडेच चर्चा रंगलेली आहे. 'नवा गडी अन् नवं राज्य' या नाटकावर आधारित 'टाईमप्लीज' हा मराठी चित्रपटालाही प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला होता. आज प्रिया आणि उमेश यांचा लग्नाचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांनी आपला खास असा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हेही वाचा : भूमी पेडणेकरचा सर्वात बोल्ड सिनेमा इंटरनेटवर लीक; पाहणारे म्हणतायत...

यावेळी आपल्या लग्नाच्या 12 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपला एकत्र लिपलॉक फोटो शेअर केला आहे. सध्या ते दोघं हे सिडनी येथे आहेत कारण सध्या त्यांचे नाटक 'जर तरची गोष्ट' याचा सिडनी येथे दौरा सुरू आहे. तेव्हा सध्या प्रियानंही आपले तिकडचं काही फोटो हे शेअर केले आहेत. त्यामुळे सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. प्रिया आणि उमेशनं अनेकदा एकत्र ऑनस्क्रीन अनेकदा पाहायला मिळाले होते. त्यांनी एकत्र अनेक नाटकांतून कामं केली आहेत. त्याचसोबत अनेक मालिकांमधून, चित्रपटांतूनही, वेबसिरिजमधून त्यांनी कामं केली आहेत. सध्या प्रियानं आणि उमेशनं शेअर केलेल्या या फोटोत लिहिलं आहे की, '18 वर्षे प्रेमात आणि 12 वर्षांचा संसार! हे प्रेम असंच सुरू राहणार आहे. आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा!' असं या फोटोत तिनं लिहिलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

या फोटोवर मराठी कलाकारांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. मागच्या या त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री प्रिया बापटनं त्यांच्या लग्नातला एक व्हि़डीओ शेअर केला होता. ज्यात उमेश कामतनं त्यांच्या लग्नात उखाडा घेतला होता. त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.