Thank You for Coming Leaked: एकता कपूर आणि रिया कपूर यांचा 'थॅंक्यू फॉर कमिंग' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांनाही उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या महिन्याभरापासून या चित्रपटाची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट हीट झाला आहे की फ्लॉप हे सध्या या चित्रपटांच्या रिव्ह्यूवरून आपल्याला कळून येईलच. परंतु सध्या या चित्रपटाची चर्चा इतकी जोरात आहे की हा चित्रपट लीक झाल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. काही सुत्रांनुसार असं कळते ही हा संपुर्ण चित्रपट लीक काही संकेतस्थळांवर लीक झाला असून सध्या त्याचीच चर्चा रंगलेली आहे. याआधीही असे अनेक चित्रपट आलेले आहेत. ज्यांच्या विषयांमुळे मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली होती. चित्रपटांमध्ये लैंगिकता, सेक्स आणि हिंसा आली की त्याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून या चित्रपटावरून अनेकदा मोठे वाद झाले आहेत. त्यामुळे अशा चित्रपटांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावरून चित्रपट बॅन करण्यापर्यंतही प्रेक्षकांनी मागणी केली आहे.
या चित्रपटातून भुमी पेडणेकर, शेहनाज कौर गिल, शिबानी बेदी, कुशा कपिला, सुशांत दिगवेकर यांच्या भुमिका आहेत. स्त्रीयांची लैंगिकता, प्रेम, रिलेशनशिप यावर हा चित्रपट भाष्य करतो. सध्या या चित्रपटाला फारच संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. काहींनी या चित्रपटावरून जोरदार टीका केली आहे. तर काहींना हा चित्रपट आवडला असल्याचे समजून येते आहे. यावेळी या चित्रपटाची त्यामुळे जोरात चर्चा रंगलेली आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर आल्यापासून या चित्रपटावर नाना तऱ्हेची टीकाही होताना दिसते आहे हा चित्रपट फारच अश्लील आहे. याचा विषय फार बोल्ड आहे आणि त्यातून या चित्रपटात महिलांची तोंडी असभ्य भाषा आहे अशी नानाविध टीका होताना दिसली होती. त्यामुळे कलाकारांनाही यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली होती. यावर अभिनेत्री भुमी पेडणेकर हिनं प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा : ऐश्वर्या राय बच्चनला भेटताच रडला लोकप्रिय मेकअप आर्टिस्ट; नक्की 'हा' आहे तरी कोण?
टाईम्स नाऊ आणि लेटेल्सीच्या रिपोर्ट्सनुसार हा चित्रपट HD क्वालिटीमध्ये रिलिज झाला आहे. ज्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आहे. काही युझर्सही हा चित्रपट अशा काही ठिकाणी सर्च करत आहेत. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित झाल्या झाल्या या चित्रपटाची पायरसी सुरू झाली आहे. या चित्रपटाच्या बोल्ड विषयामुळेही या चित्रपटाची पायरसी सुरू झाली आहे.