Lockdown : विंकगर्ल प्रिया प्रकाशच्या आठवणीत...

क्वारंटाइन काळात सोशल मीडियावर वेग-वेगळे मीम्स  व्हायरल होत आहेत.

Updated: Apr 7, 2020, 11:32 AM IST
Lockdown : विंकगर्ल प्रिया प्रकाशच्या आठवणीत...

मुंबई  : कोरोना व्हायरससोबत युद्ध लढण्यासाठी संपूर्ण देश एक झाला आहे. या व्हायरसला हरवण्यासाठी प्रत्येक जण अथक प्रयत्न करताना दिसत आहे. शिवाय ही महामारी घोषित झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता परंतू रुग्णांची वाढती संख्या पाहता लॉकडाऊनच्या दिवसांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच दरम्यान सरकारकडून नागरिकांनी घरात राहण्याचे आवाहन करण्यात आहे.

  

तेव्हा घरात सर्वच लोक आपला वेळ सोशल मीडियावर घालवताना दिसत आहे. या क्वारंटाइनच्या काळात सोशल मीडियावर वेग-वेगळे मीम्स  व्हायरल होत आहेत. एवढचं नाही तर हे मीम्स नेटकरी एकमेकांना टॅग देखील करत आहेत.  सध्या विंकगर्ल प्रिया प्रकाश आणि 'रामायण' मालिकेतील मंथराचे काही मिम्स मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत. 

लॉकडाऊनमुळे अनेक जुन्या मालिका पुन्हा छोट्या पडद्यावर प्रसारित होत आहेत. त्यामधील एक म्हणजे 'रामायण'. पुन्हा प्रसारित होणाऱ्या मालिकेचे डायलॉग आणि भूमिकांवर प्रचंड मिम्स व्हायरल होत आहेत. ज्यामधील प्रिया प्रकाश आणि मंथराचा एक मीम नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसत आहे. 

व्हायरल होत असलेल्या मीममध्ये प्रिया आणि मंथरा दिसत आहे. जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला तेव्हा लोकांच्या भावना प्रिया प्रकाश सारख्या होत्या, पण २१ दिवस संपता-संपता लोकांचा चेहरा मंथरा सारखा झाल्यासारखा दिसत आहे.