काजोलच्या गाण्यावर प्रियाचा रोमांटिक डान्स...

इंटरनेट सेंसेशल प्रिया प्रकाश वॉरिअरचे तरुणाईत क्रेझ कायम आहे.

Updated: May 10, 2018, 10:45 AM IST
काजोलच्या गाण्यावर प्रियाचा रोमांटिक डान्स... title=

मुंबई : इंटरनेट सेंसेशल प्रिया प्रकाश वॉरिअरचे तरुणाईत क्रेझ कायम आहे. ती जे काही करते त्याचे व्हिडिओज सोशल मीडियावर झटपट व्हायलर होतात. आपल्या डोळ्यांच्या अदांनी तिने अनेकांना घायाळ केले आहे. आता तिचे एक दोन नाही तर अनेक फॅनपेज आहेत. यावरून तिचे अनेक व्हिडिओज, फोटोज शेअर होत असतात. अशाच एक फॅनपेजवरुन तिचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला. यात प्रिया काजोलच्या सूरज हुआ मध्म... या गाण्यावर डान्स करताना दिसली. यात प्रिया एकटीच नाही तर उरु अदार लवचे को स्टार रोशन अबदुल्‍लाहसोबत डान्स करताना दिसत आहे.

यात प्रिया आणि रोशन, शाहरुख खान-काजोलच्या कभी खुशी कभी गम मधील सूरज हुआ मध्य... या रोमांटिक गाण्यावर डान्स करत आहेत. पहा त्यांचा हा व्हिडिओ...

लवकरच प्रिया वॉरिअर मल्याळम सिनेमा उरु अदार लव च्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. हा सिनेमा यावर्षी ईदच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणार आहे. डोळ्यांनी इशारे करणारा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रिया रातोरात प्रसिद्ध झाली. तिचा नटखट अंदाज सर्वांनाच भावला आणि आता ती व्हायरल गर्ल म्हणून ओळखली जाते.