प्रियंका चोप्राच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन

कोण आहे  हा नवा पाहुणा...    

Updated: Aug 10, 2020, 12:20 PM IST
प्रियंका चोप्राच्या घरात नव्या पाहुण्याचं आगमन

मुंबई : अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि गायक निक जोनसच्या (Nick Jonas) घरी एका नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. प्रियंका आणि निकच्या घरात एक नवीन कुत्रा आला आहे. या नव्या पाहुण्याच्या आगमनाची माहिती निकने त्याच्या सोशल अकाऊंटच्या माध्यमातून दिली. प्रियंकाच्या घरात आलेला पाहुणा एक हस्की ऑस्ट्रेलियन कुत्रा आहे. प्रियंका आणि निकने नव्या कुत्र्याचं पँडा असं ठेवलं आहे.

ट्विट करत निक म्हणाला की, 'कुटुंबामध्ये तुझं स्वागत पँडा.. पँडा एक हस्की ऑस्ट्रेलियन कुत्रा आहे. आम्ही पूर्वीपासूनच या कुत्र्याच्या प्रेमात आहेत.' अशा भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत निक आणि  प्रियंकाने त्यांच्या नव्या पाहुण्याचं घरात स्वागत केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Welcome to the family Panda! Panda is a Husky Australian Shepard mix rescue and we’re already in love @pandathepunk @ginothegerman @diariesofdiana @priyankachopra @hollywood_huskies

A post shared by Nick Jonas (@nickjonas) on

दरम्यान, नव्या पाहुण्यासह निक आणि प्रियंकाचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. निकने हा फोटो शेअर केल्यानंतर काही क्षणांतचं फोटोला १ कोटी ४५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

निक आणि प्रियंका कायम सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांचे  प्रत्येक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात. शिवाय त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.