close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

जेव्हा अभिनेत्री चाहत्याला भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचली

कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहू न शकल्यामुळे 'ही' अभिनेत्री रूग्णालयात पोहोचली.

Updated: Sep 1, 2019, 06:29 PM IST
जेव्हा अभिनेत्री चाहत्याला भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा चक्क तिच्या चाहत्याला भेटण्यासाठी रूग्णालयात पोहोचली आहे. जोनास ब्रदर्सने 'हॅपिनेस बिगेन्स कॉन्सर्ट'मध्ये सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी चाहत्याला भेटण्यासाठी थेट रूग्णालय गाठलं. कॉन्सर्टमध्ये उपस्थित राहू न शकल्यामुळे तिन्ही जोनास ब्रदर्स आणि प्रियांका चोप्रा रूग्णालयात पोहोचले. 

चक्क प्रियांका आपल्याला भेटायला आल्यामुळे रूग्णालयात असलेली प्रियांकाची चाहती फार खुश होती. यावेळेस त्यांनी गप्पा देखील मारल्या. त्याचप्रमाणे फोटो सुद्धा काढले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

नुकताच प्रियांकाने बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना जोनास ब्रदर्सयांच्या सिंगिग कार्यक्रमात उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्याच्या कार्यक्रमात उपस्थित राहून खेर प्रचंड उत्साही झाले होते. त्यांचे काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर देखील शेअर केले होते.

प्रियांका तिच्या आगामी 'द स्काय इज पिंक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहान अख्तर आणि प्रियांका ही जोडी 'दिल धडकने दो' या चित्रपटानंतर आता पुन्हा 'द स्काय इज पिंक'मधून एकत्र येणार आहे. चित्रपटात जायरा वसीम प्रियांकाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.