काय? प्रियंका चोप्राचं वेगासमध्ये गुपचुप लग्न?

कुठे केलं लग्न 

काय? प्रियंका चोप्राचं वेगासमध्ये गुपचुप लग्न?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा आणि निक जोनस यांच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या दोघांनी आपल्या लग्नाच्या तारखेचा देखील खुलासा केला आहे. रिपोर्टनुसार आता ही जोडी देखील यावर्षी लग्नबंधनात अडकणार आहे. प्रियंका आण निक आपलं लग्न जोधपूरमध्ये करणार आहे. 3 दिवस चालणारा हा शाही सोहळा 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंबरपर्यंत सुरू असणार आहे. पण आता काही तरी वेगळीच बातमी समोर येत आहे. या दोघांनी वेगासमध्ये लग्न केल्याच समजतं आहे. तसेच याचे फोटो देखील समोर आले आहेत. 

आयरिश अॅक्टर एमेट ह्यूने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रियंका चोप्रा आमि निक जोनस एकत्र दिसत आहेत. फोटो बघून असं वाटतं की, या दोघांनी अगदी गपचूप लग्न केलं आहे. प्रियंका गेल्या काही दिवसांपासून वेगासमध्येच राहत आहे. 

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आता ग्लोबल श्रेणीत सहभागी झाली आहे. 2016 नंतर तिने बॉलिवूडमध्ये एकही सिनेमा केला नाही. आता प्रियंका अमेरिकेत स्थायिक झाली आहे. क्वांटिको आणि अनेक सिरिज, सिनेमांमध्ये प्रियंका आपल्याला दिसली आहे.