....म्हणून प्रियांकाकडून 10 वर्षे लहान निकची जोडीदार म्हणून निवड

देसी गर्लनं परदेशी जोडीदार निवडला आणि.... 

Updated: Aug 25, 2021, 06:08 PM IST
....म्हणून प्रियांकाकडून 10 वर्षे लहान निकची जोडीदार म्हणून निवड  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : प्रेम ही भावना आयुष्यातील सर्वात सुंदर भावना आहे. अनेकांना प्रेमात पडल्यावर जगण्याचा खरा अर्थ कळतो, तर एखाद्या व्यक्तीसाठी प्रेम खुप काही शिकवून जातं. प्रेमात असणाऱ्या व्यक्तीला आपल्यापुढं सारं जग ठेंगणं वाटतं आणि त्यात वावगं काहीच नाही. 

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं.... असं म्हणताना प्रेमाच्या नात्यातला नि:स्वार्थ भाव लगेचच आपल्या मनाचं दार ठोठावतो. प्रेमाच्या या सुंदर भावनेच्या बळावर आजवर कित्येत जोड्यांनी सहजीवनाच्या नव्या प्रवासाची सुरुवात केली. कलाविश्वातही याची अनेक उदाहरणं पाहायला मिळाली. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती, निक जोनास यांचं नातं त्यांचंच एक उदाहरण. 

(Priyanka Chopra) प्रियांका आणि (Nick Jonas)  निक यांच्या वयामध्ये बराच फरक असूनही या दोघांनी विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय करण्यामागेही खास कारण होतं. खुद्द प्रियांकानंच ओप्रा विनफ्रे यांना दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला होता. 

पहिल्या अतिशय वाईट रिलेशनशिपमुळं प्रियांका पुरती खचली होती. तिनं सारं लक्ष करिअरवरच केंद्रीत करण्यास सुरुवात केली होती. निकच्या मॅसेजनंतरही तिनं याकडे दुर्लक्षच केलं होतं. त्यातच या दोघांच्या वयातही मोठा फरक होता. पण, असं असतानाही निकसोबत ती पहिल्यांदाच बाहेर गेली तेव्हा तिचा दृष्टीकोन पूर्ण बदलला. 

भारीच...! दिसताक्षणी बदलतंय 'या' अभिनेत्रीचं रुप; पाहा हे नेमकं कसं शक्य 

 

निकसोबतच्या त्या भेटीबाबत सांगताना प्रियांका म्हणाली, 'मी त्याला पाहून हैराण होते. तो अतिशय आत्मविश्वासू, समजुतदार व्यक्ती आहे. माझी स्वप्न आणि माझ्या वाट्याला आलेलं यश पाहून तो आनंदी असतो. त्यानं खऱ्या अर्थाने माझ्याशी या प्रवासात प्रशंसनीय भागीदारी निभावली आहे. मला वाटतं की त्याला माझी आईच माझ्या जीवनात घेऊन आली आहे. आई आणि माझ्या वडिलांच्या नात्यातही अतिशय सुरेख असा समतोल होता. त्या दोघांनाच पाहून मी मोठी झाले होते. मला फार आनंद आहे की निकच्या बाबतीतही मला हेच सारं अनुभवता आलं'. 

पैसा, प्रसिद्धी या साऱ्याच्या पलीकडे जात नात्यांचा पाया कसा भक्कम करता येईल याकडे प्रियांका आणि निकनं लक्ष दिलं. त्यांचं हे नातं अनेकांसाठीच कपल गोल्स देणारं ठरत आहे.