'क्वांटिको 3' च्या सेटवरून प्रियंकाने शेअर केले फोटोज...

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या परदेशात 'क्वांटिको' या टी.व्ही. शो मध्ये व्यस्त आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Feb 23, 2018, 05:47 PM IST
 'क्वांटिको 3' च्या सेटवरून प्रियंकाने शेअर केले फोटोज... title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या परदेशात 'क्वांटिको' या टी.व्ही. शो मध्ये व्यस्त आहे. 'क्वांटिको' मधील आपली सहकलाकार मार्ली मॅटलिनसोबतचे काही खास क्षण तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले.

प्रियंकाने शेअर केले फोटोज

हे फोटोज शेअर करताना प्रियंका लिहते की, मार्ली मॅटलिन ही अत्यंत उत्तम अभिनेत्री आहे. पण ती चांगली उशीही होऊ शकते. या फोटोत प्रियंका मॅटलिनच्या मांडीवर डोके ठेवून झोपली आहे. 
प्रियंका सध्या 'क्वांटिको'च्या तिसऱ्या सीजनचे शूटिंग करत आहे. या शो मध्ये प्रियंका एलेक्स पेरिसच्या भूमिकेत दिसणार आहे. 

 

And then he said.. “I hate to see you go... but I love to watch you leave.. “ #dayatwork @abcquantico pic credit @chanchal_dsouza

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

नवे कॅलेंडर प्रदर्शित 

अलिकडेच टूरिज्म डेवलपमेंट कॉर्पोरेशनचे नवे कॅलेंडर प्रदर्शित झाले. ज्यात प्रियंकाचे फोटोही आहेत. याला कॉंग्रेस पार्टीच्या एका नेत्याने विरोध दर्शवला. नेत्यांनी प्रियंकाच्या ड्रेसवर टिका  केली. प्रियंका चोप्रा आसाम राज्य टूरिज्मची अॅम्बेसेटर आहे.