प्रियंका चोप्राचा ऑस्कर 2018 मध्ये सहभाग नाही, हे आहे खरं कारण

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Mar 5, 2018, 10:14 AM IST
प्रियंका चोप्राचा ऑस्कर 2018 मध्ये सहभाग नाही, हे आहे खरं कारण  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राने हॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. 

आणि त्यानंतर ऑस्कर अवॉर्ड्समध्ये देखील ती सहभागी झाली. मात्र यावेळी प्रियंका चोप्रा ऑस्कर सोहळ्यात सहभागी होणार नाही. प्रियंका चोप्रा रेड कार्पेटवर आपल्या लूकमुळे कायम चर्चेत राहिली आहे. रेड कार्पेटवर तिने कायम नवीन ट्रेंड सेट केलं आहे. मात्र आता रेड कार्पेटचा ती हिस्सा नाही. याची माहिती प्रियंकाने स्वतः दिली आहे. 

इंस्टाग्रामवर शेअर केली ही गोष्ट 

प्रियंकाने इंस्टाग्रामवर एक स्टेटस स्टोरी शेअर केलं आहे. यामध्ये तिने ऑस्करमध्ये नॉमिनेट झालेल्या आपल्या मित्रांना खास शुभेच्छा दिल्या आहे. मी आजारी आहे. त्यामुळे मी ऑस्करमध्ये यावर्षी सहभागी होऊ शकत नाही. म्हणून मी तुम्हाला खास शुभेच्छा देत आहे.

प्रियंका चोप्रा आपल्या क्वांटिकोच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. तसेच ती आपल्या बॉलिवूड सिनेमांच्या प्रोजेक्टमध्ये देखील बिझी आहे.