Pushpa 2 Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2: द रूल’ हा चित्रपट काल 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना या चित्रपटाला घेऊन चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाला घेऊन प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता होती. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटर्समध्ये गर्दी केली होती. इतकंच नाही तर थिएटरमध्ये नाइट शो देखील सुरु केले होते. आता ओपनिंग डेला या चित्रपटानं किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. तर या चित्रपटानं आता एक नवा रेकॉर्ड केला आहे.
अल्लू अर्जुनच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हा आकडा जाणून घेण्यासाठी सगळे उत्साही आहेत. या चित्रपटानं ‘जवान’, ‘अॅनिमल’, ‘केजीएफ चॅप्टर 2’ ‘कल्कि’, ‘बाहुबली 2’ सारख्या अनेक चित्रपटांना मागे टाकलं आहे. आता ‘पुष्पा 2: द रूल’ नं या सगळ्यांचे रेकॉर्ड मोडले आहेत. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी बक्कळ कमाई केली आहे.
या चित्रपटानं शाहरुखच्या जवानला देखील मागे टाकलं आहे. ‘जवान’ नं ओपनिंग डे च्या दिवशी हिंदी भाषेत 65 कोटींची कमाई केली होती. रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’नं 54 कोटींची कमाई केली होती. आता अल्लू अर्जुनच्या या चित्रपटानं त्या दोन्ही चित्रपटांचा रेकॉर्ड मोडला आहे. हिंदीत या चित्रपटानं 67 कोटींची कमाई केली आहे. अशात या चित्रपटांनं ‘जवान’ पेक्षा 2 कोटीं पेक्षा जास्त कमावत मागे टाकलं आहे.
हेही वाचा : 'पुष्पा 2' च्या स्क्रिनिंगदरम्यान अचानक बिघडली सिनेरसिकांची तब्येत, घडला घाबरवणारा प्रकार
दरम्यान, 'पुष्पा 2' नं विकेंड नसतानाही एक नवा रेकॉर्ड बनवला आहे. पिंकव्हिलाच्या रिपोर्ट्सनुसार, अल्लू अर्जुनचा या चित्रपटानं शाहरुख खानच्या ‘पठान’ च्या कलेक्शनला मागे टाकलं आहे. सगळ्यात मोठा हा नॉन-हॉलिडे हिंदी ओपनर ठरला आहे. पहिल्या दिवशीच या चित्रपटानं 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. 'पुष्पा 2' नं या चित्रपटानं सगळ्या भाषांमध्ये 165 कोटींचं कलेक्शन केलं आहे. अशात आता विकेंडला हा चित्रपट किती कलेक्शन करणार याकडे सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.