'आम्हाला तुझा गर्व वाटतोय...' आर माधवनच्या मुलाने नक्की केलं तरी काय?

आर माधवनच्या मुलाचं सर्वत्र कौतुक, कुटंबासह महाराष्ट्रालाही वाटेव गर्व...

Updated: Oct 27, 2021, 08:11 AM IST
'आम्हाला तुझा गर्व वाटतोय...' आर माधवनच्या मुलाने नक्की केलं तरी काय?

मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणात अडकल्यानंतर स्टारकिड्सवर अनेकांच्या नजरा आहेत. आर्यननंतर अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. एवढंच नाही दिवंगत अभिनेता सुशांत  सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक नामांकीत सेलिब्रिटी एनसीबीच्या कचाट्यात सापडले. अनेक स्टारकिड्स वादाच्या भोवऱ्यात असताना '3 इडियट्स' फेम आर माधवन  (R Madhavan)चा मुलगा वेदांत माधवनने (Vedaant Madhavan) वडिलांना आणि कुटुंबाला गर्व वाटावं असं काम केलं आहे. 

बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या ज्युनियर नॅशनल ऍक्वाटिक चॅम्पियनशिपमध्ये वेदांतने महाराष्ट्रासाठी सात पदके जिंकली आहेत. वेदांतच्या या यशावर त्याचे वडील प्रचंड खूश आहेत. सोशल मीडियावरही यूजर्स ट्विट करून वेदांत माधवनचे अभिनंदन करत आहेत. वेदांत माधवननेBasavaganudi Aquatic Centre  येथे झालेल्या स्विमिंग स्पर्धेत चार रौप्य आणि तीन कांस्यपदके जिंकली आहेत. 

 वेदांतच्या विजयानंतर लोक त्याचे आणि त्याचे वडील आर माधवनचे सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन व्यक्त करत आहेत. द ब्रिजच्या रिपोर्टनुसार, वेदांतने 800 मीटर फ्री स्टाईल स्व‍िमिंग, 1500 मीटर फ्री स्टाईल स्व‍िमिंग, 4×100 मीटर फ्री स्टाईल पोहणे आणि 4×200 मीटर फ्री स्टाईल स्व‍िमिंग रिले इव्हेंटमध्ये रौप्य पदके जिंकली आहेत. त्याने 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर फ्रीस्टाइल जलतरण प्रकारात कांस्यपदक जिंकले.

आर माधवने  बॉलिवूडशिवाय तमिळ चित्रपटांमध्येही काम केलं आहे. त्याने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटही केले आहेत. 'रामजी लंदन वाले', 'रहना है तेरे दिल में', 'रंग दे बसंती', 'तनु वेड्स मनु', '3 ईडियट्स', 'साला खड़ूस' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. माधवनच्या आगामी चित्रपटाचं नाव  ‘द नंबी इफेक्‍ट’ आहे.