VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

Dakshata Thasale Updated: Apr 10, 2018, 12:55 PM IST
VIDEO : 'राजी' चा जबरदस्त ट्रेलर झाला लाँच  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता विक्की कौशलचा 'राजी' हा सिनेमा रिलीज होणार आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या सिनेमाची भरपूर चर्चा आहे. आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या सिनेमांत आलीया आपल्याला वेगवेगळ्या भूमिका साकारतना दिसत आहे. हा सिनेमा हटके असणार आहे यात शंका नाही. 

या सिनेमांत 1971 मध्ये भारत - पाकिस्तानमध्ये होणाऱ्या युद्धाची कथा मांडली आहे. या सिनेमाची गोष्ट हरिंदर सिक्काच्या उपन्यास कॉलिंगच्या कथेवर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमांत आलीया एका कश्मीरी मुलीची 'सहमत' ची भूमिका साकारत आहे. जिचं लग्न पाकिस्तानी सेनेतील एका अधिकाऱ्याशी होतं. विक्की या सिनेमांत पाकिस्तानी अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. 

या सिनेमाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन आणि जंगली पिक्चर्स यांनी केली आहे. या सिनेमाची शूटिंग कश्मीर, पंजाब आणि मुंबईत केली आहे. आलिया आणि विक्की यांच्या या सिनेमाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. आलिया या दिवसांत 'ब्रम्हास्त्र' या सिनेमाच्या तयारीत दिसत आहे.