कन्फर्म : रणबीरने आलियासोबतच नातं स्वीकारलं

आलिया - रणबीरमध्ये खास नातं 

कन्फर्म : रणबीरने आलियासोबतच नातं स्वीकारलं

मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून रणबीर - आलियाच्या अफेअरची चर्चा रंगली आहे. एवढंच नव्हे तर हे दोघे अनेकदा एकत्र पाहायला मिळत आहे. यामुळेच अधिक चर्चा होत असताना अखेर रणबीर कपूरने आलिया आणि त्याच्या नात्याबाबत मत मांडल आहे. संजूचा ट्रेलर लाँच झाल्यावर आलिया भट्टने ट्विट करून  रणबीर कपूरचं भरभरून कौतुक केलं. आणि पुन्हा एकदा रणबीर - आलियाच्या नात्याची चर्चा रंगली. 

काय म्हणाला रणबीर?

आतापर्यंत या दोघांनी आपल्या नात्याबद्दल कधीच काही बोललं नव्हतं. पण अखेर रणबीर कपूरने मौन सोडलं आहे. आणि या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रणबीर कपूरने आलियासोबत असलेलं आपलं नातं स्विकारलं असून. एका मुलाखतीत तो म्हणाला आहे की, हो आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. त्याने पुढे म्हटलं की, आमचं हे नातं अगदी नवीन आहे. आम्हाला याबद्दल फारसं काही माहित नाही. त्यामुळे फार काही बोलता येणार नाही. त्यामुळे हे नातं खुलायला मला आणखी थोडा वेळ हवा असून आम्हाला स्पेस मिळण्याची आवश्यकता आहे. 

'संजू' स्टार रणबीर कपूरने सांगितलं की, आलिया अभिनय करते किंवा खाजगी आयुष्यात जे काही करते त्याने मी प्रभावित आहे. कलाकार आणि माणूस म्हणून रणबीरला आलियासारख राहायला आवडेल. त्यामुळे या नात्याला आम्ही समजून घेत आहोत. या नात्याला थोडा वेळ दिला पाहिले. 

आलिया भट्ट आणि रणबीर ब्रम्हास्त्र या सिनेमातून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या शूटिंग दरम्यान याचं नातं खुललं आहे. रणबीरने आलियाचा वाढदिवस यूरोपमध्ये सरप्राइज प्लान केला होता. त्यामुळे हे नातं आणि हा सिनेमा दोघांसाठी खूप खास असणार आहे.