मुंबई : नेटफ्लिक्सवरील सिनमा Unfreedom मधील अभिनेता राहुल वोहरा याचं निधन झालं आहे. खूप दिवसांपासून राहुल वोहरा कोरोना व्हायरसशी लढत होता. मात्र अभिनेत्याने लढता लढता अखेरचा श्वास घेतला. थिएटर दिग्दर्शक आणि नाटक लेखक अरविंद गौरने फेसबुक पोस्ट लिहून राहुलच्या निधनाची माहिती दिली.
राहुल वोहराने शनिवारी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. ज्यामध्ये त्याने आपल्या तब्बेतीची माहिती दिली होती. राहुलची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याची तब्बेत वारंवार बिघडतच गेली. यावरूनच त्याने फेसबुक पोस्ट लिहिली.
राहुल वोहराने निधनापूर्वी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. 'मला पण योग्य उपचार मिळाले असते तर मी वाचलो असतो. तुमचा राहुल वोहरा.' एक रूग्ण म्हणून राहुलने सगळी माहिती इथे दिली होती. सोबतच त्याने लिहिलं की,'लवकरच जन्म घेईन आणि चांगल काम करेन. आता हिम्मत हरलो आहे.' त्याच्या काही वेळातच दिग्दर्शक अरविंद गौरने राहुलच्या निधनाची पोस्ट केली.
अरविंद गौरने दिलेल्या माहितीनुसार, राहुल वोहरा यांच्या निधनाची माहिती दिली. 'राहुल वोहराचं निधन झालं. माझा मेहनती कलाकार आता या जगात नाही. कालच माझं त्याच्याशी बोलणं झालं. चांगल्या उपचाराने माझं आयुष्य वाचवलं जाऊ शकतं. असं तो म्हणत होता.'