धक्कादायक : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’चा टीझर आॅनलाइन लीक

सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 2.0 या सिनेमाचा टीझर ऑनलाईन लीक झाला आहे. 

Updated: Mar 4, 2018, 04:13 PM IST
 धक्कादायक : सुपरस्टार रजनीकांत यांचा ‘२.०’चा टीझर आॅनलाइन लीक title=

मुंबई : सुपरस्टार रजनीकांत यांचा आगामी 2.0 या सिनेमाचा टीझर ऑनलाईन लीक झाला आहे. 

 ‘२.०’ या चित्रपटाचा टीझर आॅनलाइन लीक झाल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. यामुळे रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत यांचा प्रचंड संताप झाला असून, त्यांनी याबाबतची स्पष्ट शब्दात निंदा केली आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले की, सिनेमाचा टीझर अशाप्रकारे आॅनलाइन लीक करणे अजिबातच समर्थनार्थ नाही. केवळ काही सेकंदांच्या उत्साहासाठी निर्मात्यांना वर्षानुवर्ष मेहनत करावी लागते. कष्ट आणि भावनांना बाजूला सारून अशाप्रकारचे कृत्य करणे एक हार्टलेस अ‍ॅक्ट आहे.’

 ‘२.०’ या चित्रपटातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच तो व्हायरल झाला. दीड मिनिटांच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सिनेमाच्या भव्यतेचा अंदाज लावणं अनेकांनाच सहज शक्य झालं. भारतीय कलाविश्वात साकारल्या गेलेल्या सिनेमांमध्ये ‘२.०’ आतापर्यंतचा सर्वाधिक महागडा सिनेमा ठरत असून त्यासाठी जवळपास ४०० कोटींचा निर्मिती खर्च आला असल्याच्या चर्चा आहेत. अशा या ‘साय-फाय’ चित्रपटाचा टीझर लीक झाल्यामुळे निर्मात्यांमध्ये सध्या चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, गेल्या आठवड्यात रजनीकांत यांच्याच ‘काला’ या सिनेमाबद्दलही अशाच प्रकारची घटना समोर आली होती. कारण या सिनेमाचा टीझर अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्याअगोदरच आॅनलाइन लीक करण्यात आला होता. ‘२.०’च्या टीजर लीकबद्दल असा अंदाज लावला जात आहे की, हा सर्व प्रकार विदेशातून केला गेला आहे. ज्याठिकाणी चित्रपटाच्या ग्राफिक्सचे काम केले जात होते.