मेंटल है क्या मधील कंगना-राजकुमारचा खतरनाक लूक...

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना राणावत आपल्या अभिनय कौशल्यामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत.

Updated: Mar 8, 2018, 08:04 AM IST
मेंटल है क्या मधील कंगना-राजकुमारचा खतरनाक लूक...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना राणावत आपल्या अभिनय कौशल्यामुळे चांगलेच लोकप्रिय आहेत. आपल्या भूमिकांना पुरेपूर न्याय देणाऱ्या या दोघांचा नवा सिनेमा मेंटल है क्या येऊ घातला आहे.

सिनेमाचे पोस्टर्स प्रदर्शित

या सिनेमाचे पोस्टर्स राजकुमार राव आणि कंगना राणावत सातत्याने शेअर करत आहेत. आतापर्यंत सिनेमाचे तीन पोस्टर्स समोर आले आहेत.या तिन्ही पोस्टर्समध्ये दोघेही वेगवेगळ्या अवतारात दिसत आहेत. बॉलिवूड क्वीनसोबत राजकुमार राव पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहे.

निर्मिती आणि दिग्दर्शन 

या सिनेमाची निर्मिती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सने केली आहे.तर सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रकाश कोवेलमूडी करत आहेत.

 राजकुमार राव म्हणाला...

या सिनेमाबद्दल राजकुमार राव म्हणाला की, ही अतिशय अद्भूत कथा आहे. अगदीच अनोखी आणि विचित्र कॉमेडी यात पाहायला मिळेल.मेंटल है क्या या सिनेमाची कथा कनिका ढिल्लों यांनी लिहीली आहे.