Rishabh Pant on Rajnikant Tweet: सध्या बॉक्स ऑफिसवर कांतारा या चित्रपटाचीच चर्चा आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळीकडे पुरता धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे दाक्षिणात्त्य चित्रपटांची सध्या सगळीकडेच हवा आहे. (Rajnikant praises rishabh shetty kannada movie kantara says masterpiece in indian cinema)
साऊथ सिनेसृष्टीतील कांतारा या चित्रपटाची सध्या सगळीकडे धुमाकूळ सुरू आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे मोठे आकडे मोडले आहेत. ऋषभ शेट्टी दिग्दर्शित हा चित्रपटाचं कौतुक केवळ सर्वसामान्यांमध्येच नाही तर सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळत आहे. दक्षिणेतील मोठे स्टार्स कांताराचं कौतुक करत आहेत. त्याचबरोबर साऊथचा मेगास्टार रजनीकांतनेही या चित्रपटाचे जोरदार कौतुक केले आहे.
हेही वाचा - Samantha Ruth Prabhu ची डिमांड आणखी वाढली... आता घेणार 'इतके' कोटी रूपयांचं मानधन?
कांतारा या चित्रपटाचा सोशल मीडियावर सतत बोलबाला आहे. सगळ्या सेलिब्रेटींनी कांताराबद्दल आपल्याला प्रतिक्रिया दिल्या आहेत. रजनीकांत यांनी ट्विटरवर चित्रपटाबाबतचा त्यांचा अनुभव सांगितला आहे. त्यांनीही या चित्रपटाचे भरभरून कौतुक केले आहे. रजनीकांत यांनी सांगितले की त्यांना तर चित्रपट पाहून अंगावर शहारे आले. ऋषभ शेट्टीचा अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन कौशल्याचेही त्यांनी कौतुक केले. या चित्रपटाचे कौतुक करताना रजनीकांत यांनी हा भारतीय चित्रपटसृष्टीचा उत्कृष्ट नमुना असल्याचे म्हटले आहे. रजनीकांत पुढे लिहितात, “ऋषभ शेट्टी, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून तुला सलाम. भारतीय चित्रपटसृष्टीतील या उत्कृष्ट कलाकृतीच्या संपूर्ण कलाकारांचे आणि टीमचे अभिनंदन.''
रजनीकांतचे कौतुक होणे हे ऋषभ शेट्टीसाठी ‘स्वप्न सत्यात उतरल्यासारखे’ होते. मेगास्टार रजनीकांत यांच्या ट्विटला उत्तर देताना त्यांनी लिहिले, 'प्रिय रजनीकांत सर, तुम्ही भारतातील सर्वात मोठे सुपरस्टार आहात आणि मी लहानपणापासून तुमचा चाहता आहे. तुमच्या कौतुकाने माझे स्वप्न साकार झाले. तुम्ही मला अधिक स्थानिक कथा करण्यासाठी प्रेरित करता आणि आमच्या प्रेक्षकांना सर्वत्र प्रेरित करता. धन्यवाद साहेब'.
हेही वाचा - टेलिव्हिजन अभिनेत्रीकडून बॉलिवूडची पोलखोल... नेपोटिझमवर केलं खरमरीत वक्तव्य
एका रिपोर्टनुसार, मंगळवारी या चित्रपटाने 4 कोटींहून अधिक कमाई केली होती, तर यशच्या 'KGF 2' चित्रपटाने केवळ 3 कोटींची कमाई केली होती. अशा परिस्थितीत 'कंतारा'सारख्या छोट्या बजेटच्या चित्रपटाने यशच्या बिग बजेट चित्रपटाचा विक्रमही मोडला. कांताराच्या कथेत पौराणिक कथा आणि अंधश्रद्धेची रंजक कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाशी लोक स्वत:ला जोडू शकत असल्याचे बोलले जात आहे.