'सासूबाई... खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका...', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल

Rakhi Sawant on Ankita lokhande :  राखी सावंतनं व्हिडीओ शेअर करत अंकिताचा पती विकी जैनच्या आईला खडेबोल सुनावले आहेत.

दिक्षा पाटील | Updated: Jan 15, 2024, 07:02 PM IST
'सासूबाई... खा,प्या मजा करा, पण कैकेयी बनू नका...', राखी सावंतने विकी जैनच्या आईला सुनावले खडेबोल title=
(Photo Credit : Social Media)

Rakhi Sawant on Ankita lokhande : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या तिच्या नवऱ्यासोबत 'बिग बॉस 17' मध्ये दिसत आहे. नुकत्याच झालेल्या फॅमिली वीकमध्ये विकी जैनची आई रंजना जैन यांनी अंकिताला खूप काही सुनवलं. रश्मि देसाईपासून ऐश्वर्या शर्मापर्यंत इतर कलाकारांनी अंकिताला पाठिंबा दिला. आता राखी सावंतनं देखील एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती रंजना जैन यांना म्हणाली आहे की मज्जा करा पण कैकयी बनू नका. 

राखी सावंतनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती अंकिता लोखंडेला 'बिग बॉस 17' ची विजेता असल्याच बोलत आहे. त्याशिवाय अंकिताच्या सासूला चार गोष्टी सुनावल्या आहेत. हॅलो मित्रांनो, मला अंकिताच्या सासूला काही गोष्टी सांगायच्या आहेत. 'सास भी कभी बहू थी'. त्या दोघांच्या भांडणात तुम्ही का पडताय? तुम्ही काय करत आहात? खा, प्या आणि शांत बसा. असं पण, अंकिता बिग बॉस जिंकणार आहे. ही राखी सावंतची भविष्यवाणी आहे. तेव्हा तर तुम्हाला खूप आनंद होईल. माझी सून जिंकली, असं म्हणाल.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

पुढे अंकिता म्हणाली, 'अंकिताच्या सासूबाई असं करू नका. मुलाच्या आणि सुनेच्या भांडणात पडू नका. आमच्या घरीही खूप भांडणं व्हायची. पण, माझी आई यात कधीच पडली नाही. सूनेचा मान ठेव. तिचा मान ठेवलास तर तुझ्या मुलींनाही सासरी मान मिळेल. आम्ही सगळे अंकितावर खूप प्रेम करतो. अंकिता माझ्या बहिणीसारखी आहे. मी तुमच्या घरीही आले होते. तुम्ही मला देवीसारख्या वाटायचा. तुम्ही कैकयी बनू नका. घर सांभाळा ते तोडू नका. तिला पण आनंदानं प्रेमाणं ठेवा'. 

हेही वाचा : बच्चन कुटुंबातील वादाच्या चर्चेत ऐश्वर्या ठरली सगळ्यात श्रीमंत अभिनेत्री, 'या' देशात कोट्यवधी रुपये

दरम्यान,अंकिता आणि राखीचे गेल्या अनेक दिवसांपासून त्या दोघांची सतत भांडण होत असल्याचे पाहायला मिळाले. ते दोघं त्या शोमध्ये आनंदी दिसले नाही असं त्यांचे चाहते बोलतात. मात्र, सोशल मीडियावर अनेकदा अंकिताला ती ओव्हर अॅक्टिंग करते असं म्हणतं ट्रोल करण्यात आलं.