दुबईमध्ये Rakhi Sawant बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात? video Viral

राखी सावंत पुन्हा अडकली लग्नाच्या बेडीत? नववधूच्या रुपात 'ड्रामा क्विन' दिसताच चर्चांना उधाण...  video Viral  

Updated: Aug 29, 2022, 11:34 AM IST
दुबईमध्ये Rakhi Sawant बॉयफ्रेंडसोबत अडकली विवाह बंधनात? video Viral  title=

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी राखीने खुलासा केला होता की, ती रितेशपासून विभक्त झाल्यानंतर आदिल खान दुर्रानीला डेट करत आहे. अनेकदा राखी आणि आदिलला एकत्र स्पॉट देखील करण्यात आलं. एवढंच नाही तर, खुद्द राखीने देखील आदिलसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत. सध्या राखीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफन व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी नवरीच्या रुपात, तर आदिल नवरदेवाच्या रुपात दिसत आहे. 

राखी आणि आदिलचा व्हिडीओ पाहून 'ड्रामा क्विन'ने लग्न केलं का? असा प्रश्न अनेक चाहते विचारत आहे. पण दुबईत गेलेल्या राखीने बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं नसून, फक्त पारंपरिक लूकमध्ये फोटो शूट केला आहे. राखी आणि आदिलचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिऍलिटी शो 'बिग बॉस 15'मधून बाहेर आल्यानंतर राखी सावंत चर्चेत राहिली होती. 'बिग बॉस'मध्ये तिने पती रितेशची सगळ्यांना ओळख करून दिली होती आणि काही काळानंतर तिने रितेशपासून वेगळं होण्याची घोषणाही केली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता ती तिच्या नवीन बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. आदिलने दुबईत तिच्या नावावर आलिशान घर घेतलं असल्याचं देखील राखीने सांगितलं आहे.