Rakul Preet Singhचा बोल्ड अंदाज, दिसणार कॉन्डम टेस्टरच्या भूमिकेत

रकुल प्रित सिंह लवकरच तिच्या वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. 

Updated: Apr 26, 2021, 02:02 PM IST
Rakul Preet Singhचा बोल्ड अंदाज, दिसणार कॉन्डम टेस्टरच्या भूमिकेत title=

मुंबई : अभिनेत्री रकुल प्रित सिंह लवकरच तिच्या वेगळ्या आणि हटके भूमिकेत दिसणार आहे. यााआधी कोणत्याही अभिनेत्रीने अशी भूमिका सकारली नाही. रॉनी स्कुवाला रकुल प्रीत सिंहसोबत एक वुमन सेंट्रिक चित्रपट प्रेक्षकांसाठी घेवून येणार आहे. या अनोख्या चित्रपटात रकुल एका कॉन्डम टेस्टर महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. आता अत्यंत वेगळ्या थाटणीचा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीस येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

रिपोर्टनुसार, रकुल या चित्रपटात काम करण्यासाठी तयार आहे. हा चित्रपट एक सोशल कॉमेडी असणार आहे. चित्रपटाच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण रकुल कॉन्डम टेस्टर महिलेच्या भूमिकेत दिसणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

जी लोक अजूनही कॉन्डमबद्दल उघडपणे बोलत नाहीत, अशां लोकांचे विचार बदलण्यासाठी चित्रपट बनवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. एकंदर चित्रपट बोल्ड असून चित्रपटाच्या मार्फत जनजागृती देखील करण्यात येणार आहे. 

याशिवाय, रकुल लवकरच 'सरदार का ग्रँडसन'मध्ये अभिनेता अर्जुन कपूर सोबत रोमांस करताना दिसणार आहे.  'सरदार का ग्रँडसन' नेटफ्लिक्स ओरिजनल चित्रपट असून 18मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी काश्वी नायर यांच्या खांद्यावर आहे. चित्रपटाची कथा नवीन आणि पूर्णपणे वेगळी आहे. चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्ण कुमार, मोनिशा आडवाणी, मधु भोजवानी, निखिल आडवाणी  यांनी केली आहे.