‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अडकला विवाह बंधनात

राणा आणि मिहिका यांचा हायप्रोफाईल विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीत पार पडला.      

Updated: Aug 9, 2020, 09:53 AM IST
‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अडकला विवाह बंधनात

मुंबई : ‘बाहुबली’ फेम भल्लाळदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबती ८ ऑगस्ट रोजी मिहिका बजाजसोबत अखेर विवाह बंधनात अडकला. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या  लग्नाची चर्चा सोशल मीडियावर तुफान रंगताना दिसत होती. कोरोना काळात  राणा आणि मिहिका एका पवित्र बंधनात बांधले गेले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल होताना दिसत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

And happily ever after! Follow us @weddingsofhyderabad for more celebrity wedding stories #pellikuthuru #ranadaggubati #bajaoed #teluguwedding #celebritycoupleinsta #hyderabadi #designerlehenga #indianjewellery #indianbridalmakeup #bridallehenga #bridallenghashyderabad #bridallooks #uncutjewellery #indianbridaljewellery #indianbridalhairstyle #weddingday #indianweddingbuzz #bigfatindianwedding #telugubride #celebritywedding #weddingsofhyderabad #lehengalove #miheekabajaj #ranamiheeka #kundanjewellery #indianweddinginspiration #indianweddingjewellery #weddingoftheyear #ranamiheekawedding #miheekaranawedding

A post shared by Weddings of Hyderabad (@weddingsofhyderabad) on

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

ranadaggubati and MiheekaBajaj take the vows! #RanaMiheekaWedding #RanaMiheeka #RanaDaggubati #MiheekaBajaj

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

मिहिकाचे सौंदर्य  वधूच्या रूपात फुलून दिसत होते तर राणा देखील वराच्या रूपात उठावदार दिसत होता. मिहिका उत्तर भारतीय कुटुंबातील आहे. पण तिचा जन्म हैदराबादमध्ये झाला. ती तेलुगु भाषाही बोलते. मिहिका ही राणा दग्गुबतीच्या घरापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर राहते.

मिळालेल्या माहितीनुसार कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे राणा आणि मिहिका यांचा हायप्रोफाईल विवाह सोहळा अत्यंत साध्या पद्धतीत पार पडला. त्याच्या लग्नात फक्त ३० पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

The epic bridal entry! Miheeka in a gorgeous outfit by Anamika Khanna! Follow us @weddingsofhyderabad for more celebrity wedding stories #pellikuthuru #ranadaggubati #tollywood #teluguwedding #celebritycoupleinsta #hyderabadi #designerlehenga #indianbridalentry #indianbridalmakeup #bridallehenga #bridallenghashyderabad #anamikakhanna #uncutjewellery #indianbridaljewellery #indianbridalhairstyle #weddingday #indianweddingbuzz #bigfatindianwedding #telugubride #celebritywedding #weddingsofhyderabad #lehengalove #miheekabajaj #ranamiheeka #kundanjewellery #indianweddinginspiration #indianweddingjewellery #weddingoftheyear #ranamiheekawedding #bajaoed

A post shared by Weddings of Hyderabad (@weddingsofhyderabad) on

लग्नाविषयी बोलताना, राणा दग्गुबती आणि मिहिका बजाजच्या कुटुंबियांनी कोरोनामुळे लग्नाचा विधी घरीच करण्याचा निर्णय घेतला आहे. हैदराबादच्या ज्युबिली हिल्समधील राणा आणि मिहिकाच्या घरात लग्नापूर्वीचं प्री-वेडिंग सेलिब्रेशन मोठ्या कमी लोकांच्या उपस्थित उत्साहात साजरा झाला.