कोरोनामुक्त झाल्यावर रणबीर-आलिया मालदीवला रवाना

मालदीवला कलाकारांची भेट 

Updated: Apr 19, 2021, 06:39 PM IST
 कोरोनामुक्त झाल्यावर रणबीर-आलिया मालदीवला रवाना

मुंबई : '99 Songs'चे निर्माता ए आर रहमान या सिनेमाची सध्या जोरदार चर्चा रंगत आहे. या सिनेमाकरता ए आर रहमानने बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीला पसंती दिली होती. ए आर रहमानने देखील या जोडीला पसंती दिली आहे. आलिया भट्टच्या नावाचा विचार केला होता. फिल्म इंडस्ट्रीमध्ये लोकं आलियाच्या करिअरमधील ही सर्वात मिसिंग सिनेमा म्हणतं आहे. 

आलियाच्या दोन मोठ्या बजेट सिनेमे एकापाठोपाठ सुपरफ्लॉप होत आहेत. 'गंगुबाई काठियावाडी' आणि 'ब्रम्हास्त्र' दोन्ही सिनेमे आपटले. या दरम्यान कोरोनाने पुन्हा एकदा आपलं डोकं वर काढलं आहे. रणबीर कपूरसोबत सोमवारी आलिया मालदीवला रवाना झाली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोमवारी सकाळी मुंबई एअरपोर्टवर दिसले. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघं मालदीवला जात आहेत. रणबीर कपूर मार्च महिन्यात कोरोना संक्रमित झाला होता त्यानंतर आलियाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आता दोघंही कोरोनामुक्त झाले आहेत. यानंतर या दोघांना मुंबई एअरपोर्टवर कॅज्युअल लूकमध्ये पाहण्यात आलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

गेल्या काही दिवसांपासून मालदीव ही कलाकारांची फेव्हरेट व्हॅकेशन प्लेस ठरली आहे. रविवारी दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ देखील या ठिकाणी गेले. त्या अगोदर सारा अली खान आणि अमृता सिंह देखील गेली आहे. सोशल मीडियावर याची खूप चर्चा आहे.