Rakhi Sawant करता Salman Khan बनला 'देवदूत', केली खास गोष्ट

का म्हणाली राखी सावंत सलमानला देवदूत 

Updated: Apr 19, 2021, 04:50 PM IST
Rakhi Sawant करता Salman Khan बनला 'देवदूत', केली खास गोष्ट

मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) ची आई खूप दिवसांपासून आजारी आहे. राखीच्या आईला कॅन्सर झाल्याची माहिती तिने काही दिवसांपूर्वी दिली होती. राखीच्या आईचं आता ऑपरेशन होणार असल्यामुळे त्यांना पुन्हा एकदा रूग्णालयात दाखल केलं आहे. हॉस्पिटलमधून राखी सावंतने आपल्या आईचा एक व्हिडिओ पोस्ट केला आबे. ज्यामध्ये तिने सलमान खानचे आभार मानले आहेत. हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. 

राखीने शेअर केला आईचा व्हिडिओ 

राखी सावंत (Rakhi Sawant) आणि तिच्या आईने सलमान खानचे आभार मानले आहेत. याचं मोठं कारण आहे. सलमान खानने राखीच्या आईचा उपचारासोबतच ऑपरेशनचा खर्च केला आहे. राखी, सलमान (Salman Khan) खानला देवदूत म्हणते. व्हिडिओमध्ये राखीची आई सलमान खानला आशिर्वाद देतेय. सलमान राखीच्या आईचा उपचार एका नामांकित कॅन्सर डॉक्टरकडून करत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखीची आई रुग्णालयात दाखल 

राखी (Rakhi Sawant) ची आई या ऑपरेशननंतर ठीक होणार आहे. राखीच्या आईने जया सावंतने (Jaya Sawant) व्हिडिओत म्हटलंय की,'सलमान खान (Salman Khan) अगदी देवाप्रमाणे आमच्यासाठी धावून आला आहे. मी त्याची आभारी आहे. देव त्याला आनंदी ठेव.' रूग्णालयात राखीची आई हॉस्पिटलमध्ये दिसत आहे.