'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य

रणबीर कपूर लवकरच नितेश तिवारीच्या महत्त्वाकांक्षी 'रामायण' चित्रपटात झळकणार आहे. रणबीर या चित्रपटात प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणार असून, त्याच्या चाहत्यांमध्ये याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.  

Intern | Updated: Dec 9, 2024, 04:24 PM IST
'माझ्यासाठी प्रभू श्रीराम म्हणजे...', रामायणातील भूमिकेवर पहिल्यांदाच रणबीरचं वक्तव्य title=

Ranbir Kapoor On Playing Lord Ram In Ramayana: गेल्या वर्षी रणबीरच्या 'अ‍ॅनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोटींची कमाई करत धुमाकूळ घातला होता. आता तो नितेश तिवारीच्या 'रामायण' या ऐतिहासिक चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात रणबीरसोबत अभिनेत्री साई पल्लवी 'माता सीते'च्या भूमिकेत दिसणार आहे. साई पल्लवी या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात अनेक कलाकार आहेत यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.  

रणबीर कपूरने सौदी अरेबियातील 'रेड सी फिल्म फेस्टिव्हल' दरम्यान रामायण चित्रपटातील भूमिकेबद्दल प्रथमच भाष्य केले. तो म्हणाला, 'श्रीरामांची भूमिका करणे म्हणजे माझ्यासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या संधीसाठी मी खूप विनम्र आहे.' रणबीरचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याला प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहत्यांनी त्या व्हिडीओवर कमेंट्स करुन भरपूर प्रेम दिले आहे.  

रामायणाचा पहिला भाग पूर्ण  
रणबीरने पुढे सांगितले, 'सध्या मी 'रामायण'वर काम करत आहे, जी मायथॉलॉजिकल कथा आहे. माझा बालपणीचा मित्र नमित मल्होत्रा हा मेहनतीने हा चित्रपट तयार करत आहे. त्याने एक अप्रतिम कलाकार आणि सर्जनशील टीम उभी केली आहे. नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनतो आहे. 'रामायणा'च्या पहिल्या भागाचे शूटिंग पूर्ण झाले आहे आणि लवकरच दुसऱ्या भागाचे शूटिंग सुरू होईल. हा चित्रपट दोन भागांत आहे, ज्याचा पहिला भाग दिवाळी 2026 आणि दुसरा भाग दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट भारतीय संस्कृती, कुटुंब आणि पती-पत्नीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. बिग बजेट चित्रपट बनवण्यासाठी अशा कलाकारांची आवश्यकता होती, जे एकत्र येऊन हे महत्त्वाकांक्षी स्वप्न पूर्ण करतील.'

यशची रावणाच्या भूमिकेत एंट्री  
या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश रावणाची भूमिका साकारणार आहे. याशिवाय, तो या चित्रपटाचा सहनिर्माताही आहे. यशने नुकतेच सांगितले की, 'जर पात्र योग्य पद्धतीने सादर केले नाही, तर चित्रपट बनवणे अशक्य होईल.'  

उर्वरित कलाकारांचा सहभाग  
रणबीर कपूर आणि साई पल्लवी व्यतिरिक्त, चित्रपटात अरुण गोविल आणि लारा दत्ता 'दशरथ' आणि 'कैकेयी' यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच, सनी देओल 'हनुमाना'च्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा अजून झाली नाही.