मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, रणबीर कपूरला ऋषी कपूर यांची कोणती गोष्ट खटकली?

रणबीर कपूरने एका मुलाखतीत संपूर्ण कपूर कुटुंबातील लोकांच्या यश आणि अपयशाबद्दल सांगितलं. यावेळी त्याने आपल्या वडिलांसारखं आपल्याला व्हायचं नाही, असं विधान केलं आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jul 29, 2024, 07:42 PM IST
मला माझ्या वडिलांसारखं व्हायचं नाही, रणबीर कपूरला ऋषी कपूर यांची कोणती गोष्ट खटकली? title=

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरने अलीकडेच त्याचे वडील आणि दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. रणबीरने सांगितले की, ऋषी कपूर यांच्याकडे जेव्हा त्यांचे चाहते ऑटोग्राफ किंवा फोटो घेण्यासाठी यायचे तेव्हा ते अनेकदा त्यांच्याशी उद्धटपणे वागायचे. मात्र, वडिलांच्या या सवयीतून आपण शिकलो आणि आपण असे करायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली. 

यश आणि अपयश जवळून पहा

रणबीर कपूरने खुलासा केला की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांचे यश आणि अपयश दोन्ही फार जवळून पाहिले आहे. यासोबतच आपल्या अपयशामागे कोणती कारणे आहेत हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. निखिल कामथशी बोलताना अभिनेता म्हणाला, "मी लहानपणापासून माझ्या कुटुंबातील आणि संपूर्ण कपूर कुटुंबातील सदस्यांचे यश आणि अपयश पाहत असे. मला हे फार लवकर समजले कारण मी एका चित्रपट कुटुंबात वाढलो आहे."

अपयशातून शिकला

रणवीर पुढे म्हणाला की, "मी खूप यशस्वी माणसे पाहिली आहेत आणि मी अपयशाशी झुंजतानाही पाहिले आहे. त्यांच्या अपयशाचं कारणही मला कळलं आहे. मी त्यांना समजून घेतले आणि अगदी लहानपणापासून हे पाहिल्यामुळे मी या सगळ्याचा खूप विचार केला आहे."

ऋषी कपूर चाहत्यांना फटकारायचे

रणबीर कपूरने त्याचे वडील ऋषी कपूर यांच्याबद्दल सांगितले की, त्यांना चाहत्यांचा राग यायचा. अनेकदा ऋषी कपूर आपल्या फॅन्सवर भडकल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले आहेत. पण रणवीर कपूरला मात्र या सगळ्यात काही रस नाही. रणवीर कपूर म्हणाला, "जेव्हा चाहते माझ्या वडिलांकडे यायचे, तेव्हा मी त्यांच्या चेहऱ्याकडे बघायचे. अनेक चाहते तिरक्साकाने तर कधी निराशेने माझ्या वडिलांकडे बघायचे हे देखील रणवीर म्हणाला. तेव्हा मी ठरवले होते की, मी माझ्या चाहत्यांसोबत असे कधीच करणार नाही. .आज जेव्हा कोणी माझ्याकडे फोटो किंवा ऑटोग्राफ साठी येतात तेव्हा मी त्यांच्याशी अतिशय नम्रपणे वागतो.