Ranbir Kapoor Waheeda Rehman: परवा राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी पुरस्कारप्राप्त सेलिब्रेटी उपस्थित होते. दिल्ली येथे पार पडलेल्या या सोहळ्यातील एक व्हिडीओ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यावेळी या पुरस्कार सोहळ्याला अनेक माध्यमांचे प्रतिनिधी आणि छायाचित्रकार आलेले होते. वहिदा रेहमानही यावेळी येथे उपस्थित होत्या. त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले होते. यावेळी पुरस्कार स्विकारताना त्यांना अश्रुही अनावर झाले होते. पुढच्या सीटवर ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या बसलेल्या होत्या. त्यांच्यापुढे उभ्या असलेल्या छायाचित्रकारांनी बराच गदारोळ माजवला. पहिल्या सीटवर बसलेल्या वहिदा रेहमान यांना घाईगडबड करू लागलेल्या फोटोग्राफर्सकडून बराच त्रास होऊ लागला आणि त्या फारच घाबरल्या. त्या जिथे बसल्या होत्या ते टेबलही जोरजोरात हलू लागले होते.
अशाप्रकारे छायाचित्रकारांचे गैरवर्तन पाहून वहिदा रेहमान यांच्या मागे बसलेला रणबीर कपूर फारच भडकला. हे पाहताच तो आपल्या सीटवरून त्वरित उठला आणि छायाचित्रकारांना ओरडू लागला. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. त्याचे हे वर्तन पाहून नेटकरी त्याचे कौतुक करताना दिसत आहेत. तर अनेकांनी असं म्हटलं आहे की रणबीर हा थेट आपल्या वडिलांवरच गेला आहे. ऋषी कपूरही अनेकदा मीडियावर आणि पापराझींवर भडकायचे. रणबीर कपूरचं वर्तन पाहून त्याला ज्येष्ठ अभिनेत्रींचा किती आदर हे लक्षात येते, असंही अनेक नेटकऱ्यांनी म्हटले आहे. यावेळी त्याच्या बाजूला बसलेली आलियाही या प्रकारानं चिडलेली दिसते. तिला पहिल्यांदा कळत नाही की काय होतं तेव्हा रणबीर तिला समजावून सांगतो.
यावेळी राष्ट्रीय पुरस्कारांची चर्चा होती. आलिया भट्ट, क्रिती सनन, अल्लू अर्जुन, करण जोहर, विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी असे अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते. यावेळी सगळ्यांचीच जोरात चर्चा होती. विवेक अग्निहोत्रींचीही यावेळी चर्चा होती. करण जोहरला पाहताच त्यांनी डोळे फिरवले होते आणि सोबतच त्यांनी करण जोहरचा फोटोही क्रॉप केला होता. त्यावरून बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.
रणबीर कपूरचा एनिमल हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यातून अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तडकी स्टारकास्टही दिसणार आहे.
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.