अच्छा...! तर रणबीर कपूर असा पडला होता दीपिकाच्या प्रेमात

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन बी-टाऊनमधील चांगलंच प्रसिद्ध कपल होते. मात्र, या दोघांचं अफेअर फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघे वेगळे झाले.

Updated: Aug 25, 2017, 02:19 PM IST
अच्छा...! तर रणबीर कपूर असा पडला होता दीपिकाच्या प्रेमात title=

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन बी-टाऊनमधील चांगलंच प्रसिद्ध कपल होते. मात्र, या दोघांचं अफेअर फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघे वेगळे झाले.

या दोघांची लव्हस्टोरी सुरू कशी झाली होती? हे अनेकांना अजूनही माहिती नाहीये. मात्र, आता याचा खुलासा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून रणबीर आणि दीपिकाचा एक इंटरव्ह्यू सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या इंटरव्ह्यूमध्ये रणबीर आणि दीपिकाने खुलासा केला होता की, ते कसे प्रेमात पडले होते. 

दीपिका म्हणाली की, पहिल्या सिनेमावेळी या दोघांनी केवळ ऎकमेकांची नावे ऎकली होती. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या दोघांचे मेकअप आर्टीस्ट भरत आणि डोरिस हे होते. एके दिवशी डोरिस म्हणाला की, रणबीर खूप चांगला मुलगा आहे आणि तुम्ही दोघांने ऎकमेकांना भेटायला हवं.

दीपिकाने पुढे सांगितले की, एक दिवस डोरिसने अचानक रणबीरला बोलवून घेतलं आणि आम्हाला ऎकमेकांसोबत बोलायला सांगितलं. हीच आमची पहिली भेट आणि याच भेटीत आम्ही ऎकमेकांचे मोबाईल नंबर एक्सचेंज केलेत. त्यानंतर २००७ मध्ये आम्ही लंचला बाहेर गेलो. पूर्ण दिवस ऎकमेकांसोबत घालवला. त्यानंतर आमच्या नियमीत भेटीगाठी सुरू झाल्या. आम्ही पहिल्यांदा मिस्टर बीन हा सिनेमा एकत्र पाहिला होता. त्यानंतर आम्ही लॉंग ड्राईव्हला गेलो आणि त्यानंतर रणबीरने मला घरी सोडलं. आम्ही २३ फेब्रुवारी २००८ पासून ऎकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं.  

तेच रणबीर म्हणाला की, मला आठवतं की, दीपिकाने पांढ-या रंगाची लिनेन पॅंट परिधान केली होती आणि केस गुंडाळले होते. दीपिका मला आवडणारी सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तिचं सकारात्मक विचार करणं. आता हे दोघेही वेगळे असून दीपिका रणबीर डेट करती आहे. तर रणबीर हा सध्या सिंगल आहे.