इटलीत नाही तर इथे करणार दीप - वीर लग्न

कुठे होणार लग्न 

इटलीत नाही तर इथे करणार दीप - वीर लग्न  title=

मुंबई : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचा लग्नाची पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. आता हे दोघे चाहते कुठे लग्न करणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. कारण बॉलिवूडमधील ही लोकप्रिय जोडी आहे. हे दोघे एकमेकांना 5 वर्षांपासून डेट करत आहेत. 

ही लव्हस्टोरी 2013 मध्ये सुरू झालेल्या 'रामलीला' च्या सेटपासून सुरू झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकणार आहे. 13 नोव्हेंबरपासून या लग्नाच्या सगळ्या विधी सुरू होणार आहेत.

अशी चर्चा होती की, दीपिका - रणवीर देखील विराट - अनुष्काप्रमाणे इटलीत लग्न करणार आहेत. त्यांनी देखील इटलीतील लेक कोमो बुक केलं आहे. 

मात्र आता अशी माहिती मिळाली आहे की, दीपिका - रणवीरने लग्नाचा वेन्यू बदलला आहे. लग्नाच्या अगदी 20 दिवस अगोदर या दोघांनी वेगळ्या ठिकाणी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. हे वेन्यू बदलण्या मागचं महत्वाचं कारण समोर आलं आहे. 

असं सांगितलं जातं आहे की, या दोघांचे नातेवाईक लग्नासाठी इटलीत पोहोचू शकत नाही. त्यामुळेच आता हे दोघे इटलीत नाही तर मुंबईत लग्न करणार आहेत. मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये संगीत, मेहंदी,लग्न आणि रिसेप्शन होणार आहे. याकरता या दोघांनी वेडिंग प्लानर हायर केले आहेत. याच वेडिंग प्लानरला सोनम कपूर आणि आनंद अहुजा यांनी लग्नाकरता ठेवलं होतं. 

हे दोघे ही बी टाऊनच्या मित्रांकरता 1 डिसेंबर रोजी 5 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शन ठेवणार आहेत. तसेच एक रिसेप्शन बंगलुरूमध्ये देखील होणार आहे. तर 1 डिसेंबर रोजी प्रियंका - निकचं लग्न जोधपुरमध्ये होणार आहे.